‘इसिस’चे 1.25 लाख ट्विटर अकाऊंट्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:04 IST2016-02-07T07:34:39+5:302016-02-07T13:04:39+5:30

ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचे काम इसिसतर्फे केले जाते.

Close 1.25 lakh Twitter accounts in ISIS | ‘इसिस’चे 1.25 लाख ट्विटर अकाऊंट्स बंद

‘इसिस’चे 1.25 लाख ट्विटर अकाऊंट्स बंद

ong>ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचे काम इसिसतर्फे केले जाते. याची दखल घेत ट्विटरने कठोर पाऊले उचलत आहे.



ट्विटरतर्फे प्रकाशित एक ब्लॉगमध्ये माहिती दिली की, 2015 च्या मध्यापासून ते आतापर्यंत ट्विटरने ‘इसिस’शी निगडित 1.25 लाखांपेक्षा जास्त अकाऊंट्स बंद पाडली आहेत. अकाऊंट्स बंद करण्यामागची प्रक्रिया सांगताना कंपनीने ब्लॉगमध्ये लिहिले की, केवळ इतर यूजर्सनी तक्रार (रिपोर्ट) केली तरच कंपनी अ‍ॅक्शन घेते. मात्र, अशा तक्रारींरेचे निवारण लवकरात लवकर करण्यासाठी ‘नियंत्रण कक्षाचे’ मनुष्यबळ वाढविले आहे.

सोशल नेटवर्किंग साईट्सवरून दहशतवादाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, गुगलवर सरकार, न्यायालय आणि तपास यंत्रणांचा दबाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर ट्विटरने स्वत:हून उचललेले हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे, असे इंटेलिजन्स कमिटीचे प्रमुख अ‍ॅडम शिफ यांनी म्हटले. इतक्या मोठ्या प्रमाण कार्यवाही करण्याची पहिलीच वेळ आहे. दहशतवादी गट आता कमी प्रचलित साईट्सकडे वळू लागले आहेत.



जानेवारी महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा कमिटीच्या उच्चपदस्थ अधिकाºयांनी सिलिकॉन व्हॅलीतील बड्या टेक्नो कंपन्यांच्या लीडर्सना याविषयावर बोलणी करण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र एकाही कंपनीने त्यांचे प्रमुख अधिकारी पाठविले नाही. सरकारशी जास्त जवळीक दाखविली तर लोकांशी आपला कनेक्ट तुटेल या भीतीने कंपन्या दचकुन असतात. परंतु सरकार आणि कंपन्यांमध्ये समन्वय असेल तरच दहशतवादासारख्या गंभीर समस्येशी दोन हात करता येईल.

Web Title: Close 1.25 lakh Twitter accounts in ISIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.