व्हॉट्स अॅपच्या व्हिडिओ कॉलिंग इन्व्हाईट लिंकवर क्लिक करणे धोक्याचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:49 IST2016-11-22T17:49:49+5:302016-11-22T17:49:49+5:30
१५ नोव्हेंबरपासून व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू झाली असून, यूजर्स खूप आनंदात आहेत. हे नवे फिचर आपल्या प्रत्येक मित्राच्या मोबाईलमध्ये येण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये एक लिंक व्हायरल होताना दिसत आहे.
.jpg)
व्हॉट्स अॅपच्या व्हिडिओ कॉलिंग इन्व्हाईट लिंकवर क्लिक करणे धोक्याचे!
१ नोव्हेंबरपासून व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू झाली असून, यूजर्स खूप आनंदात आहेत. हे नवे फिचर आपल्या प्रत्येक मित्राच्या मोबाईलमध्ये येण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये एक लिंक व्हायरल होताना दिसत आहे. 'या लिंकवर क्लिक केल्यावरच तुम्हाला व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलिंग सुरू करता येईल', असा दावा या लिंकमध्ये केला आहे. मात्र या इन्व्हाईट लिंकवर क्लिक करणे धोक्याचे असल्याचे तज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
हे नवे फिचर सुरू झाल्यापासून हॅकर्सनी हॅकींगसाठी एक नवी शक्कल लढवली असून, व्हिडिओ कॉलिंग संदर्भातील लिंक व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हायरल केली असल्याचे समजते. आपण जर या लिंकवर क्लिक केले तर एक वेबपेज ओपन होते. त्यावर तुम्हाला हे फिचर चालू करण्यासाठी पुन्हा एकदा क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे.
ही लिंक सुरूवातीला विश्वासार्ह वाटत असल्यामुळे व्हॉट्स अॅप यूजर्स त्यावर क्लिक करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लिंकपासून सावध रहा. व्हॉट्स अॅप कॉलिंगचे फिचर तुमच्या मोबाईलमध्ये सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्स अॅप कॉलिंगसाठी तुमच्या गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअरवर जाऊन तुमचे अॅप अपडेट करा. त्यानंतर आपोआप तुमचे व्हिडिओ कॉलिंग सुरू होईल.