चपला आणि शूज सिलेक्ट करताना सावधानता बाळगा; नाहीतर होतील 'हे' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:12 PM2018-07-06T12:12:45+5:302018-07-06T12:17:39+5:30

choosing a wrong shoe can give these diseases to you | चपला आणि शूज सिलेक्ट करताना सावधानता बाळगा; नाहीतर होतील 'हे' आजार!

चपला आणि शूज सिलेक्ट करताना सावधानता बाळगा; नाहीतर होतील 'हे' आजार!

Next

फॅशनचे वेगवेगळे ट्रेन्ड तरूणाई फॉलो करताना पहायला मिळते. मग ती कपड्यांची फॅशन असो किंवा मग हेअर स्टाईलची असो. दागिन्यांची असो किंवा पायातल्या चपला आणि शूजची असो. सगळ्याच बाबतीत आपल्याला ट्रेन्डी फॅशन पहायला मिळते. सध्याच्या फॅशन सेन्सनुसार लोकं आपले कपडे, सध्या सुरू असलेला फॅशन ट्रेन्ड, त्यांचा लुक यागोष्टींचा सारासार विचार करून आपल्या चपला आणि शूजची फॅशन ठरवतात. परंतु खरे पहाता शूज आणि चपला खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कम्फर्ट... तुम्ही नेहमी पायात अशा चपला आणि शूज घातले पाहिजेत, जे घ्यातल्याने तुम्हाला पायांना त्रास होणार नाही. चुकीच्या साईझचे अथवा चुकीच्या स्टाईलच्या चपला पायात घातल्याने पायांसंबंधिच्या अनेक व्याधी आपल्याला जडण्याची शक्यता असते. 

फॅशनच्या या ट्रेन्डी जमान्यात पुरूष आणि महिला वेगवेगळ्या प्रकारच्या चपला परिधान करतात. फिटिंग शूज, हाय हिल्स, नॅरो शूज आणि टाईट शूजना लोकांची जास्त पसंती असते. काही लोक इतके नॅरो शूज वापरतात की, त्यामुळे त्यांना पायांच्या दुखण्यांना सामोरे जावे लागते. तसेच यामुळे त्यांना चालतानाही त्रास सहन करावा लागतो. परंतु काही लोकांनाच हे ठाऊक असेल की, पायात चुकीच्या प्रकाराच्या चपला अथवा बुट घातल्याने पायासंबंधिच्या अनेक आजार होण्याचा धोका असतो. आपण जाणून घेऊयात असे केल्याने कोणते आजार जडण्याची शक्यता असते...

एथलिट फूट 

हा पायांमध्ये होणारा एक आजार असून याचे संक्रमण पायांच्या बोटांना होण्याची शक्यता असते. हा आजार फंगल इन्फेक्शनमुळे होतो. यामुळे खाज आणि जळजळसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. जास्तवेळ टाईट शूज घातल्याने पायांच्या बोटांमध्ये घाम येतो आणि इन्फेक्शन होते. 

गोखरू 

या प्रकारामध्ये गाठ तयार होत असून नेहमी तळवे आणि पायाच्या बोटांमध्ये होते. दिवसभर खूप टाईट सॉक्स घातल्याने पायाची बोटं आणि तळव्यांवर दबाव येतो. त्यामुळे गोखरू होण्याचा धोका संभवतो. हा आजार पायाच्या मोठ्या बोटांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. परंतु इतर बोटांनाही होऊ शकतो.

फूट कॉर्न्‍स

हा आजार चुकीच्या पद्धतीचे शूज घातल्याने पायाच्या तळव्यांमध्ये होतो. संक्रमण झालेल्या ठिकाणी जाड त्वचेचे डाग तयार होतात. आणि त्यावर दबाव आला तर ते वाढत जातात. फूट कॉर्न्स झाल्याने बऱ्याचदा पायांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. घरगुती उपायांनी फूट कॉर्न्‍सवर सहज उपचार केला जाऊ शकतो. 

मधुमेह 

जे लोक मधुमेहाने त्रस्त आहेत त्यांना पायाच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. मधुमेह असलेल्या लोकांनी आपल्या पायात घालणाऱ्या चपलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. पायांना कम्फर्ट अशा चप्पला खाज आणि जळजळ होते. टाईट शू घातल्याने बऱ्याचदा पायाला फोड येतात आणि त्या फोडांचे रूपांतर जखमांमध्ये होते. मधुमेह असलेल्या लोकांच्या शरिरावरील जखमा लवकर बऱ्या होत नसल्याने असे होणे आरोग्याला फार घातक असते. 

हॅमर टो

टाईट आणि अरूंद शूज घातल्याने हा आजार होतो. कारण असे शूज घातल्याने पायाच्या बोटांवर दबाव येतो आणि पायाची बोटे दुमडली जातात. याचा सर्वात जास्त परिणाम अंगठ्या शेजारिल बोटांवर होतो. मधल्या बोटांवर सर्वात जास्त दबाव आल्यामुळे बोटे दुखू लागतात. तसेच यामुळे बोटांवरची त्वचा फार कडक होते. 

पायाच्या टाचेमध्ये गाठ

ज्यावेळी टाचेखालील हाडाचा विकास होतो त्यावेळी ही समस्या उद्भवते. यामुळे पायांची लांबी सोबतच पायाचे स्नायू आणि टाचेचे हाड यांच्यासोबत जोडलेले असते. यामुळे टाचेचा विस्तार अर्धा इंचाने वाढू शकतो. त्यामुळे पायाच्या प्रचंड दुखण्याला सामोरे जावे लागते. फार झिजलेल्या चपला अथवा शूज वापरल्याने हा आदार होण्याची शक्याता असते.

मेटाटर्साल्जिया

याला स्टोन ब्रूज असेही म्हणतात. यामुळे पायांच्या पुढील भागावर परिणाम होतो. त्यामुळे पाय फार दुखतात. यामुळे पायाच्या पुढील भागांत सूज येते. 

Web Title: choosing a wrong shoe can give these diseases to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.