​मुलांना वाटते मुलीकडून यावा प्रेमाचा प्रस्ताव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 18:45 IST2016-05-22T13:15:02+5:302016-05-22T18:45:02+5:30

एका आॅनलाईन सर्वेक्षणात सुमारे 88 टक्के मुलांनी मान्य केले की, मुलीने प्रोपोज करणे त्यांना जास्त आवडते.

Children think that love is love! | ​मुलांना वाटते मुलीकडून यावा प्रेमाचा प्रस्ताव!

​मुलांना वाटते मुलीकडून यावा प्रेमाचा प्रस्ताव!

लाला मुलगी आवडते, मुलीला मुलगा आवडतो. पण अनेकदा दोघेही एकमेकांना सांगण्याची हिम्मत करीत नाहीत. आधी कोेण सांगेल यातच कित्येक दिवस निघून जातात.

आपण विचारले अन् ती नाही म्हणाली तर, अशी मुलांना भीती तर मुलानेच आधी विचारावे अशी मुलींची अपेक्षा. यातच प्रेमाचे गोड प्रस्ताव अडकून पडलेले असतात.

पण मुलींनो तुम्हाला माहीत आहे का, की तुम्हीच यातून जास्त चांगल्या प्रकारे मार्ग काढू शकता. आता याला एका स्वर्व्हेचा आधारही मिळाला आहे. एका आॅनलाईन सर्वेक्षणात सुमारे 88 टक्के मुलांनी मान्य केले की, मुलीने प्रोपोज करणे त्यांना जास्त आवडते.

18 ते 30 या वयोगटातील सुमारे 7 हजार मुला-मुलींनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला होता. त्यातील 62 टक्के मुलींनी सांगितले की, त्यांनीच रिलेशनशिपमध्ये आधी प्रोपोज केले होते.

यामध्ये ‘डेट’च्या बाबतीत अनेक रंजक गोष्टी समोर आल्या. 52 टक्के मुलींना असे वाटते की, डेटवर गेल्यावर दोघांनीही बिल शेअर करावे. बिचाºया एका मुलावर बिलाचा सगळा भार टाकू नये (अभिनंदन मुलांनो!). परंतु 45 टक्के मुली अशादेखील आहेत ज्यांना वाटते की, निदान पहिल्या डेटवर तरी मुलानेच बिल पे करावे.

आता डेटवर कोणते कपडे घालायचे हासुद्धा मोठा प्रश्न असतो. मुलांसाठी सर्वोत्तम ड्रेस आॅप्शन म्हणजे पांढरा टी-शर्ट आणि ब्लू जीन्स, असे 91 टक्के मुलींना वाटते. तरुणाईमध्ये तर टॅटूचे तर खूप फॅड आहे. 83 मुलींनी सांगितले की, टॅटू असलेली मुलं त्यांना अधिक हॉट वाटतात तर 89 मुलांनासुद्धा टॅटू असलेली मुलगी आधिक आकर्षक वाटते.

Girl Propose

डेटवर जाण्या आधी 58 टक्के मुली आणि 51 टक्के मुलं एकमेकांचे सोशल मीडिया अकाऊंट चेक करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट मुलांसाठी आहे. अनेक मुलांना असे वाटते की, मुलगी जर तिच्या केसांच्या बटांशी खेळत असेल तर ती फ्लर्ट करत आहे. पण मित्रांनो, ते तसे नसते! 62 टक्के मुलीं म्हणतात की, केसांशी खेळताना त्या फ्लर्टिंग करायच्या खरच मूडमध्ये  नसतात. 

Web Title: Children think that love is love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.