​इंग्रजी साहित्यातील ‘चाईल्ड हिरो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:37 IST2016-02-04T06:23:16+5:302016-02-04T13:37:12+5:30

 इंग्रजी साहित्यातील अशाच काही ‘चाईल्ड हिरो’वर एक नजर....  

'Child Hero' in English Literature | ​इंग्रजी साहित्यातील ‘चाईल्ड हिरो’

​इंग्रजी साहित्यातील ‘चाईल्ड हिरो’

री पॉटर
हॅरी पॉटर हे पात्र ब्रिटिश लेखक जे. के. रोलिंग यांनी शोधले. लहान मुलांच्या दुनियेतील हे सर्वात लोकप्रिय पात्र आहे. १९९७ साली ‘हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन’याद्वारे ते पहिल्यांदा वाचकांपुढे आले. या पात्राने आपले नाव सर्वदूर पोहोचविले. विचक्राफ्टच्या होगवर्ट स्कूलमधील त्याचे शालेय जीवन, हार्मोनी ग्रँजर, रॉस विस्लेसोबतची त्याची भटकंती आणि वोल्देमार्ट या राक्षसाशी लढा हे सारे सात कादंबºयांमधून मांडण्यात आले. यावर अनेक चित्रपटही निर्माण झाले.
अ‍ॅलिस लिडेल
अ‍ॅलिस या लहान मुलीविषयी ऐकले नाही असं बहुदा कोणी आढळणार नाही. वंडरलँडमधील तिची कामगिरी अफाट आहे. लेविस कॅरोल यांनी अ‍ॅलिस या उत्सुक मुलीचे पात्र तयार केले. जी पांढºया उंदराच्या शोधात भटकत असते. ‘अ‍ॅलिस इन द वंडरलँड’ या पुस्तकातून ती वाचकांपुढे आली. अ‍ॅलिस अशा ठिकाणी पोहोचते, जे अद्भूत आहे आणि त्यातील अनुभव मजेदार आहेत. ‘थ्रु द लुकिंग ग्लास’ या पुस्तकातूनही ती दिसते. कॅरोल यांनीच बुद्धिबळावर हे पुस्तक लिहिले आहे.
आॅलिव्हर ट्विस्ट
चार्ल्स डिकन्स यांनी १८३८ साली कादंबरीतून ‘आॅलिव्हर ट्विस्ट’ची ओळख करुन दिली. एका कामाच्या ठिकाणाहून हा बालक पळून जातो. तो फॅजिन या चोरांच्या आणि पाकिटमार गँगच्या तावडीत सापडतो. शेवटी तो या गँगलाही चमका देतो आणि मि. ब्रॉनलो हे त्याचा सांभाळ करतात.  साहस, आशा आणि चांगुलपणाची ही हृदयस्पर्शी कथा आहे. त्यामुळेच हे पात्र सातत्याने लोकप्रिय ठरले आहे.

Web Title: 'Child Hero' in English Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.