​मुलांची काळजी घ्या, सेक्स लाईफ सुधारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 17:04 IST2016-06-15T11:34:29+5:302016-06-15T17:04:29+5:30

जे स्त्री-पुरुष लहान मुलांचे संगोपन करण्याच जबाबादारी समान पद्धतीने वाटून घेतात ते खाजगी व संसारिक आयुष्यातही अधिक आनंद असतात.

Child care, Improve sex life! | ​मुलांची काळजी घ्या, सेक्स लाईफ सुधारा!

​मुलांची काळजी घ्या, सेक्स लाईफ सुधारा!

ा मुलांची काळजी आणि सेक्सचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण ते खरं आहे.

अलिकडेच झालेल्या एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, जी जोडपीमुलांची काळजी घेण्यात समान सहभाग घेतात, त्यांची लैंगिक आयुष्य अधिक चांगले असते.

या अध्यनामध्ये  2006 साली गोळा करण्यात आलेल्या सुमारे एक हजार जोडप्यांच्या  माहितीचा अभ्यास करण्यात आला.

त्यानुसार जे स्त्री-पुरुष लहान मुलांचे संगोपन करण्याच जबाबादारी समान पद्धतीने वाटून घेतात ते खाजगी व संसारिक आयुष्यातही अधिक आनंद असतात.

पण जर समजा केवळ पत्नी एकटीच मुलांना सगळा वेळ देत असेल, त्यांचा सांभाळ करत असेल तर जोडप्यांमधील प्रेम ओलावा कमी होऊन नात्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि दोघेही आनंदी राहत नाही.  आता असे का होते याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज असल्यसाचे  वैज्ञानिक सांगतात.

आपण मुलांना गरजेएवढा वेळ देत नाही याभावनेने  किंवा पत्नील नाखूष पाहून पुरुष दु:खी असतात. मुलांना वेळ देणं म्हणजे पत्नी जेवण लावत असताना दहा मिनिटे खेळणे किंवा शाळेत ड्रॉप करणे एवढेचं नसते. ‘क्वालिटी टाईम’ देणे महत्त्वाचे असते.

लहान मुलांच्या संगोपनादरम्यान जोडप्यांचा तणाव वाढतो. परंतु दोघांनी जर जबाबदारी घेतली तर या तणाव कमी केला जाऊ शकतो.

Web Title: Child care, Improve sex life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.