​संजूबाबा सुटणार म्हणून ‘चिकन संजूबाबा’ फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 08:29 IST2016-02-23T15:29:32+5:302016-02-23T08:29:32+5:30

येत्या गुरुवारी अभिनेता संजय दत्त तुरुंगातून सुटणार आहे. साहजिकच त्याच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी त्याचे चाहते सज्ज झाले आहेत.

'Chicken Sanju Baba' will be available for Sanju Baba | ​संजूबाबा सुटणार म्हणून ‘चिकन संजूबाबा’ फ्री

​संजूबाबा सुटणार म्हणून ‘चिकन संजूबाबा’ फ्री

त्या गुरुवारी अभिनेता संजय दत्त तुरुंगातून सुटणार आहे. साहजिकच त्याच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी त्याचे चाहते सज्ज झाले आहेत. दक्षिण मुंबईतील नूर मोहम्मदी या हॉटेलचे मालक खालीद हामीद संजूबाबाचे मोठे चाहते आहेत. संजूबाबा तुरुंगातून सुटणार याचा आनंद त्यांच्या चेहºयावर सध्या स्पष्ट दिसत आहे. याच   आनंदात ‘चिकन संजूबाबा’ ही डीश मोफत देणार आहे. संजूबाबाच्याच हस्ते नूर मोहम्मदी हॉटेलचे उद्घाटन झाले होते. मुंबईत असला की, संजू या हॉटेलात अगदी येतोच येतो. तुरुंगातून सुटल्यानंतरही संजूबाबा नूर मोहम्मदीचा दिदार करतो का, ते पाहूच.

Web Title: 'Chicken Sanju Baba' will be available for Sanju Baba