चार्ली आधी वेगळा होता माझा - अभिनेत्री डेनिस रिचर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:14 IST2016-01-16T01:13:31+5:302016-02-09T07:14:38+5:30
माझा नवरा चार्ली शीन हा लग्नाच्या वेळी फार वेगळा होता. आता तो बददला आहे, ...

चार्ली आधी वेगळा होता माझा - अभिनेत्री डेनिस रिचर्ड
म झा नवरा चार्ली शीन हा लग्नाच्या वेळी फार वेगळा होता. आता तो बददला आहे, अशी खंत अभिनेत्री डेनिस रिचर्डस्ने व्यक्त केली आहे. या दोघांचे लग्न २00२ मध्ये झाले होते. शीन हा सध्या ५0 वर्षांचा असून तो मादक पदार्थांच्या आहारी गेला आहे. 'टू अँण्ड हाफ मॅन' मध्ये चार्लीची भूमिका होती. डेनिस ही ४४ वर्षांची आहे. ती म्हणाली, विवाहाच्या वेळी चार्ली हा अतिशय चांगला होता. अतिशय सुस्वभावी होता. त्याची जीवनशैली अतिशय सुंदर होती. आता चार्ली हा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. या जोडप्याचा २00६ मध्ये घटस्फोट झाला होता. डेनिस म्हणाली, घटस्फोटानंतरही आमचे संबंध पूर्णपणे संपले नाहीत. आमच्यात संपर्क असतो. मी कायम त्याच्या मदतीसाठी तयार आहे. पण सध्या तो मादक पदार्थांच्या आहारी गेला आहे.