५0 वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता चार्ली शीन हा सध्या एड्सशी झुंज देत आहे.
चार्ली शीनला एड्स
/>५0 वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता चार्ली शीन हा सध्या एड्सशी झुंज देत आहे. गत काळात केलेल्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्याला या जीवघेण्या आजाराने ग्रासले आहे. तरीदेखील त्याने यातून काहीही धडा घेतलेला नाही. अजूनही चार्लीचे बेफाम वागणे सुरूच आहे. आताही आपल्या आलिशान बंगल्यात तो नाईट पार्टी नियमितपणे करतो. या पार्टीमध्ये पोर्नस्टार्स या नियमित गेस्ट असतात. एका पार्टीसाठी चार्ली पोर्नस्टार्सना प्रत्येकी ३0 हजार डॉलर्स मोजत असल्याची बातमी आहे. सोबतीला वारेमाप कोकेन स्मोकिंग असतेच. या व्यतिरिक्त आपले जुने चित्रपट वारंवार बघणे एवढेच काम तो दिवसभर करतो, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्याचा हा भारी शौक त्याला कुठे घेऊन जाणार देवजाणे..