चिरतरुण दिसण्यासाठी रोज बदला त्वचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 21:33 IST2016-05-11T16:03:59+5:302016-05-11T21:33:59+5:30

चेहऱ्यावर सदैव तारुण्य दिसण्यासाठी संशोधकांनी वेयरेबल त्वचा निर्माण केली आहे.

Change skin everyday to look crunchy! | चिरतरुण दिसण्यासाठी रोज बदला त्वचा!

चिरतरुण दिसण्यासाठी रोज बदला त्वचा!

र्षक वाचून तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? रोज कशी काय त्वचा बदलणार? आपण साप थोडीच आहोत. पण, विज्ञानाला काही अशक्य आहे का?

चेहऱ्यावर सदैव तारुण्य दिसण्यासाठी संशोधकांनी वेयरेबल त्वचा निर्माण केली आहे.

‘एमआयटी’मधील संशोधकांनी अशी वेयरेबल त्वचा विकसित केली जी तुम्ही रोज सकाळी चेहऱ्यावर लावू शकता आणि रात्री काढू शकता. ही ‘कृत्रिम त्वचा’ चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि वार्धक्याची इतर सर्व लक्षणे लपवते.

सध्या प्रायोगिक त्वत्वावर झालेल्या अध्ययनामध्ये या त्वचेचे चांगलेच रिझल्ट दिसून आले आहेत. रोज घालण्यासाठी एकदम सोपी, चेहऱ्यावर रिअ‍ॅक्शन नाही आणि पाऊस व पोहतेवेळीसुद्धा कोणतीच अडचण आली नाही.

पारदर्शी असणारी ही त्वचा एका मिलीमीटरच्या सत्तर हजारव्या भागाएवढी जाड आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर ती आहे की नाही कळत नाही, इतकी ती फिट बसते.

कृत्रिम त्वचा केवळ चेहऱ्यावरील वार्धक्य लपवित नाही तर आपल्या खऱ्या त्वचेला तारुण्यात असणारी लवचिकतादेखील प्रदान करते. ही त्वचा म्हणजे दोन प्रकारच्या क्रीम्स आहेत.

सिलोक्सेन पॉलिमर क्रीमचा चेहऱ्यावर थर लावायचा. त्यानंतर दुसरी क्रीम लावायची जी पहिल्या थराला कृत्रिम त्वचेत रुपांतरीत करते. केवळ तीनच मिनिटांत तेजस्वी, चैतन्यपूर्ण, उजळ चेहऱ्याचे दर्शन घडते.

Web Title: Change skin everyday to look crunchy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.