ब्रेक अपनंतर ५ दिवसातच कॅरीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:37 IST2016-03-27T22:37:03+5:302016-03-27T15:37:03+5:30
हॉलिवूड अभिनेता जिम कॅरीच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जिमची ३० वर्षीय गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला.

ब्रेक अपनंतर ५ दिवसातच कॅरीचा मृत्यू
ह लिवूड अभिनेता जिम कॅरीच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जिमची ३० वर्षीय गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. मृतदेहाच्या शेजारी भरपूर औषधे सापडली आहेत. औषधांच्या ओव्हरडोजमुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, रात्री तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता आहे. अद्याप पोलिसांनी कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. मृत्यूपूर्वी कॅथरिओनाने सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने म्हटले, की २४ सप्टेंबरला दुसºयांदा तिचे ब्रेकअप झाले होते.