इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन पडली कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 19:04 IST2016-09-10T13:34:14+5:302016-09-10T19:04:14+5:30
टेक्सास शहरात एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरून कार पडूनही चालकाला कोणतीच दुखापत झाली नाही.

इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन पडली कार
वाहन हे दुचाकी असो किंवा चारचाकी त्याचा अपघात झाला म्हणजे मृत्यू किंवा दुखापत ठरलेलीच आहे; परंतु अमेरिकेतील टेक्सास शहरात अशी एक घटना घडली आहे. ती वाचून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरून कार पडूनही चालकाला कोणतीच दुखापत झाली नाही. येथील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये दुपारच्या तीन वाजेच्या वेळेला चालक कार पार्क करीत होता. त्याचे नियंत्रण सुटून, त्या कारने पार्किंग वायर तोंडून ती खाली पडली; परंतु ती कार वायरमध्ये अडकली. कारच्या छतावर असलेल्या सनप्रूफमधून चालक बाहेर पाहत राहिला. वायरमध्ये अडकलेल्या कारमधून नंतर चालकाला बाहेर काढण्यात आले. एवढी भीषण घटना घडूनही चालकाला कोणतीच दुखापत झाली नाही. त्यामुळे या घटनेला सर्वत्र चमत्काराच्या रूपाने पाहण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ सध्या फिरत असून, त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहे.