गुप्तता राखण्यासाठी फोन करा सायबर-प्रुफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 17:17 IST2016-05-01T11:47:52+5:302016-05-01T17:17:52+5:30

 सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात.

Call cyber-proof to maintain secrecy | गुप्तता राखण्यासाठी फोन करा सायबर-प्रुफ

गुप्तता राखण्यासाठी फोन करा सायबर-प्रुफ

ong>स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मयार्दीत राहीलेला नाही. तर त्यात बँकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे.

►सुरक्षित पासवर्ड :फोन कायम पासवर्ड लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. असे करण्यास जर तुम्ही आळस केलात तर मात्र तुमच्या फोनला शंभर टक्के धोका निर्माण होऊ शकतो.

अधिकृत साइटवरूनच खरेदी करा : फोन कायम कंपनीच्या अधिकृत साइटवरूनच खरेदी करावा. कारण अशा ठिकाणांहून घेतलेल्या फोनमध्ये सायबर क्राइमला प्रतिबंध घालणारे अ‍ॅप्स अंतर्भूत असतात. 

फ्री अ‍ॅप्सपासून सावध : फोनमध्ये असंख्य मोफत अ‍ॅप्स भुरळ घालत असतात. मात्र कुठलेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी नीट तपासून घ्यावे. अन्यथा एखादया बनावट अ‍ॅप्स तुमचा पासवर्ड मिळवण्यात यशस्वी झाला तर सर्व खासगी माहिती उघड होऊ शकते. 

वायपींग सॉफ्टवेअर अ‍ॅप : मोबाइल हरविल्यास तो सुरक्षित राहील या दृष्टीने विकसीत करण्यात आलेले वायपिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावे. हे अ‍ॅप मोफत असून मोबाइल हरविल्यास तुम्ही रिमोटच्या मदतीने त्याला त्वरीत लॉक करू शकता. 

सिक्युरीटी सॉफ्टवेअर : अधिकृत कंपनीने विकसीत केलेले सेक्युरीटी सॉफ्टवेअर वापरावे. 

Web Title: Call cyber-proof to maintain secrecy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.