आॅस्कर न मिळाल्याने भडकला सिल्वेस्टरचा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 08:20 IST2016-03-01T15:20:11+5:302016-03-01T08:20:11+5:30

हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन याला आॅस्कर मिळावा, म्हणून त्याचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले होते. सर्वोत्कृष्ट सहकलाकाराच्या शर्यतीत स्टेलॉन सर्वात आघाडीवर होता. मात्र ऐनवेळी सर्वश्रेष्ठ सहकार ठरला तो मार्क रायलांस.

The brother of Sylvester was injured when he could not get an Oscar | आॅस्कर न मिळाल्याने भडकला सिल्वेस्टरचा भाऊ

आॅस्कर न मिळाल्याने भडकला सिल्वेस्टरचा भाऊ

लिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन याला आॅस्कर मिळावा, म्हणून त्याचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले होते. सर्वोत्कृष्ट सहकलाकाराच्या शर्यतीत स्टेलॉन सर्वात आघाडीवर होता. मात्र ऐनवेळी सर्वश्रेष्ठ सहकार ठरला तो मार्क रायलांस. साहजिकच स्टेलॉनच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. केवळ स्टेलॉनच्या चाहत्यांचीच नाही तर स्टेलॉनचा भाऊ फ्रँक याचीही घोर निराशा झाली. मग काय तो आॅस्कर अकादमीवर जाम चिडला. संतापाच्या भरात त्याने अकादमीवर नाही ती टीका केली. अकादमीला स्वत:ची लाज वाटली पाहिजे. आॅस्कर स्टेलॉनलाच मिळायला हवा होता. हा मार्क कोण? असे टिष्ट्वट त्याने केले. भावाचा हा उतावीळपणा पाहून स्टेलॉन मात्र नरमला. मी कधीही हार पत्करणार नाही. आॅस्कर मिळवण्यासाठी आणखी कष्ट घेईल, असे तो म्हणाला. शिवाय भावाच्या टिष्ट्वटवर त्याने मोठ्या मनाने माफीही मागितली. माझा भाऊ भावूक आहे. माझ्यासाठी त्याच्या मनात त्याच्याबद्दल मोठा आदर आहे, अशा शब्दांत त्याने फ्रँकच्यावतीने माफी मागितली. मग? मग काय? भाऊ स्टेलॉन इतका विनम्र झालेला पाहून फ्रँकलाही उपरती झाली आणि मार्क रायलांसबद्दल अपशब्द वापरणे गैर होते, मी माफी मागतो, असे दुसरे टिष्ट्वट त्याने केले.

Web Title: The brother of Sylvester was injured when he could not get an Oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.