​ब्रिटिश राजपुत्राला सोडावा लागला ‘कोहिनूर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 22:13 IST2016-04-22T16:43:03+5:302016-04-22T22:13:03+5:30

केट आणि विल्यम यांना आग्रातील द ओबेरॉय अमरव्हिलाज्मधील ‘कोहिनूर’ हॉटेल स्विट मिळू नाही शकले. 

The British Raj pratukra had to leave 'Kohinoor' | ​ब्रिटिश राजपुत्राला सोडावा लागला ‘कोहिनूर’

​ब्रिटिश राजपुत्राला सोडावा लागला ‘कोहिनूर’

र्षक वाचून दचकलात? अहो आम्ही ‘कोहिनूर’ हिऱ्याबद्दल नाही बोलत आहे. तो तर त्यांच्याकडेच आहे. परंतु भारताच्या दौऱ्यावर आलेले ब्रिटिश राजघराण्यचे सदस्य केट आणि विल्यम यांना आग्रातील द ओबेरॉय अमरव्हिलाज्मधील ‘कोहिनूर’ हॉटेल स्विट मिळू नाही शकले. 

त्याचे झाले असे की, मलेशियाची रॉयल फॅमिली आणि ब्रिटिश राजघराणे या दोघांना देखील हॉटेलमधील सर्वोत्तम रुम ‘कोहिनूर’मध्येच थांबायचे होते. त्यामुळे दोघांनी ही रुम बुक करण्याचा प्रयत्न केला. पण मलेशियाच्या राजघराण्याने आधी बुक केल्यामुळे केट आणि विल्यम्सला ‘कोहिनूर’ सोडावा लागला.

‘कोहिनूर’ स्विट आग्रामधील ओबेरॉय अमरव्हिलाज् हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर स्थित आहे. ज्यामध्ये डायनिंग रुम, लिव्हिंग रुम, मास्टर बेडरुम आणि ‘ताजमहाला’चा स्पेक्टॅक्युलर व्यूव दिसतो. आतापर्यंत निकोलस सार्कोजी, सलमान रश्दी, बिल गेट्स यांसारख्या बड्या असामींनी ‘कोहिनूर’मध्ये मुक्काम केलेला आहे.

केट अँड विल्यम यांची लक्झरी रुमदेखील काही वाईट नाही. या रुमच्या बाथरुममधून देखील ताजमहालचे दर्शन होते. राजघराण्यासाठी हॉटेलतर्फे खास मुघलाई थाळी बनविण्यात येणार आहे.

Web Title: The British Raj pratukra had to leave 'Kohinoor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.