आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:12 IST2019-01-29T12:53:35+5:302019-01-29T13:12:48+5:30

फॅशनच्या विश्वात कधी काय ट्रेन्ड येईल काहीच सांगता येत नाही. पण दुसरीकडे असाही एक रोष बघायला मिळतो की, फॅशनच्या नावावर काहीही विचित्रपणा केला जातो.

Boohoo's bizarre reverse jeans that look like they are inside out | आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू!

आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू!

फॅशनच्या विश्वात कधी काय ट्रेन्ड येईल काहीच सांगता येत नाही. पण दुसरीकडे असाही एक रोष बघायला मिळतो की, फॅशनच्या नावावर काहीही विचित्रपणा केला जातो. आता हेच बघा ना जीन्सचं एक नवं डिझाइन आलं आहे. सध्या या जीन्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. ऑनलाइन रिटेलर बोहो ने हे डिझाइन लॉन्च केलं आहे. नक्कीच हे डिझाइन पाहून कुणाचंही डोकं चक्रावून जाईल. 

जर हा फोटो पाहून तुम्हाला वाटत असेल की, या मुलीने जीन्स उलटी परिधान केली आहे. तर तुम्ही चुकताय. कारण हे चुकून झालेलं नाहीये. जीन्सचा हा नवा ट्रेन्ड सध्या सुरू झालाय.

या जीन्सला 'मिड राइज रिवर्स जीन्स' असं नाव देण्यात आलं आहे आणि या जीन्सची किंमत १५०० रूपये ठेवण्यात आलीये.

या जीन्सच्या शिलाईवरून हे स्पष्ट दिसत आहे की, आतील पॉकेट बाहेर आले आहेत. त्यामुळे कुणालाही असं वाटू शकतं की, जीन्स चुकून उलटी घातली आहे. 

या जीन्सची सोशल मीडियातून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. बोहो ने ट्विटरवर ११ जानेवारीला या रिवर्स जीन्सची डिझाइन शेअर केली होती. 

ही पहिलीच वेळ नाहीये की, अशाप्रकारची विचित्र डिझाइन तयार करण्यात आले. याआधी कॅल्विन क्लेनने रोड रनर थीम जंपर लॉन्च केली होती.  त्यासोबत एक एक्सट्रीम कटआउट जीन्सही चांगलीच गाजली होती. 

Web Title: Boohoo's bizarre reverse jeans that look like they are inside out

टॅग्स :fashionफॅशन