बाँड कारची किंमत $3.5 मिलियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:09 IST2016-02-20T10:09:08+5:302016-02-20T03:09:08+5:30

अ‍ॅस्टन मार्टिन डीबी10 या कारची एका लिलावात अपेक्षित किंमतीपेक्षा जास्त विक्रमी किंमतीमध्ये विक्री झाली.

Bond car costs $ 3.5 million | बाँड कारची किंमत $3.5 मिलियन

बाँड कारची किंमत $3.5 मिलियन

म्स बाँड सिरिजमधील २४वा बाँडपट ‘स्पेक्टर’साठी खास बनविण्यात आलेली अ‍ॅस्टन मार्टिन डीबी10 या कारची एका लिलावात अपेक्षित किंमतीपेक्षा जास्त विक्रमी किंमतीमध्ये विक्री झाली.

सुमोर 3.5 मिलियन डॉलस (24 कोटी रु.) मोजून ही लिमिटेड एडिशन बाँड कार विकत घेण्यात आली. या चित्रपटासाठी फक्त अशा दहा कार्स तयार करण्यात आल्या होत्या.

‘जेम्स बाँड स्पेक्टर : द आॅक्शन सेल’ असे या लिलावाचे नाव होते. पहिल्या पाचच मिनिटांत कारची विक्री झाली. एक ते दीड मिलियन पाऊंड्सपासून बोली लावण्यास सुरुवात झाली होती.

तसेच चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये बाँडने घातलेल्या ‘डे आॅफ द डेड’ कॉस्ट्युमला 98.5 हजार पाऊंड्स एवढी घसघशीत रक्कम मिळाली. गायक सॅम स्मिथची स्वाक्षरांकित ‘रायटिंग्स आॅन द वॉल’ गाण्याच्या म्युझिक शीट्स 9.3 हजार पाऊंड्समध्ये विक्री झाली.

spectre

लिलावातून जमा झालेली रक्कम समाजकार्यासाठी वापरण्यात येणार आहे.

Web Title: Bond car costs $ 3.5 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.