‘द जंगल बुक’ला बॉलीवुड साऊंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 04:38 IST
‘द जंगल बुक’च्या हिंदी वर्जनसाठी इरफान खान, प्रियंका चोपडा, नाना पाटेकर, शैफाली शाह आणि ओम पुरी हे आवाज देणार आहेत.
‘द जंगल बुक’ला बॉलीवुड साऊंड
‘द जंगल बुक’च्या हिंदी वर्जनसाठी इरफान खान, प्रियंका चोपडा, नाना पाटेकर, शैफाली शाह आणि ओम पुरी हे आवाज देणार आहेत. डिज्नी इंडियाने या कलाकारांना चित्रपटाच्या हिंदी डबसाठी नुकतेच साइन केले आहे. चित्रपटात इंडियन-अमेरिकन कलाकार नील सेठी मोगलीच्या भूमिकेत असेल. येत्या ८ एप्रिल रोजी हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे. प्रियंका, इरफान हॉलीवुडमध्ये फेमस असल्याने त्यांना ही आॅफर मिळाल्याचे समजते. यामध्ये शैफाली शाह मोगलीच्या आईच्या भूमिकेला आवाज देणार आहे. तर १९९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जंगल बुक : द अॅडवेंचर्स आॅफ मोगली’ या टिव्ही सीरियलमध्ये नाना पाटेकर यांनी एका पात्राला आवाज दिल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.