संस्कृतीचा बोल्ड आणि हटके लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 19:29 IST
‘मी नार नखऱ्याची’ म्हणत बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री संस्कृती बालगुडेने सर्वांना आपल्या लावणीवर ठेका धरायला लावला.
संस्कृतीचा बोल्ड आणि हटके लुक
‘मी नार नखऱ्याची’ म्हणत बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री संस्कृती बालगुडेने सर्वांना आपल्या लावणीवर ठेका धरायला लावला. ‘पिंजरा’ मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री संस्कृती आता सिल्व्हर स्क्रिन गाजवतेय. ‘शॉर्टकट’ आणि ‘शिनगा’ सिनेमातील तिच्या प्रमुख भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे. ‘निवडुंग’ आणि ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे तिचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. संस्कृतीने नुकतेच एक हॉट फोटोशूट केलय. सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरूरकरने हे फोटोशूट केले आहे. ह्या बोल्ड आणि हटके अंदाजात संस्कृतीने आपली हॉट इमेज प्रेक्षकांसमोर आणली आहे.