बोल्ड आणि ब्युटीफूल सई ची आंतरराष्ट्रीय भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 22:43 IST2016-04-26T17:13:45+5:302016-04-26T22:43:45+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील टॉपची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री सई ताम्हणकर चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

बोल्ड आणि ब्युटीफूल सई ची आंतरराष्ट्रीय भरारी
म ाठी चित्रपटसृष्टीतील टॉपची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री सई ताम्हणकर चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘हंटर’ चित्रपटाद्वारे बोल्ड सईने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. आता या मराठमोळ्या सईने आंतरराष्ट्रीय भरारी घेत बॉलिवूडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत ‘लव्ह सोनिया’ ह्या आंतरराष्ट्रीय सिनेमात झळकणार असल्याचे समजते.
![]()
‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपेयी, अदिल हूसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर ‘लव्ह सोनिया’ या हॉलिवूडपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. स्लमडॉग मिलेनियरचे निर्माते तबे्रज नुरानी हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत. लवकरच या सिनेमाच्यां शूटिंगला सुरूवात होणार आहे.