बिकीनी ललनांचे घमासान भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 16:49 IST2016-04-03T23:49:04+5:302016-04-03T16:49:04+5:30
नदीच्या किनारी बिकिनी घातलेल्या तीन मुली एकट्या मुलीला बेदम मारहाण करताना दाखवणारा हा व्हिडियो आहे.

बिकीनी ललनांचे घमासान भांडण
आ ल्याकडे लोकल रेल्वेच्या महिला डब्ब्यांतील भांडणे नवे नाहीत. त्यांचे मजेशीर व्हिडियोदेखील सर्रास न्यूज चॅनेल्सवर पाहायला मिळतात. तसा अमेरिकेतही सध्या मुलींच्या भांडणाचा व्हिडियो व्हायरल होत आहे. नदीच्या किनारी बिकिनी घातलेल्या तीन मुली एकट्या मुलीला बेदम मारहाण करताना दाखवणारा हा व्हिडियो आहे.
द. कॅरोलिना शहरातील नदीच्या किनारी दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली. कोलंबिया पोलिस डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार आर्लिंडा क्राफ्ट (18), अॅन्स लेह हिल (19) आणि मेगन विल्यम्स (20) तीन मुलींनी एका मुलीला जबर मारहाण केली.
पीडित मुलगी जखमी झाल्याने बेशुद्ध झाली. शहरातील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले असून त्या तीन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अॅल्विन एस. ग्लेन डिटेंशन सेंटर येथे ठेवण्यात आले आहे.
स्थानिक वृत्तपत्राला मिळालेल्या व्हिडियोमध्ये आर्लिंडा, अॅन्स आणि मेगन त्या मुलीच्या चेहºयावर, शरीरावर बेदमपणे हल्ला करताना दिसतात. पीडित मुलगी खाली पडून वाचण्याचा केविलपणे प्रयत्न करत होती.