जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:51 IST2016-02-07T00:21:23+5:302016-02-07T05:51:23+5:30

जर तुम्हाला जगभरातील सर्वोत्कृष्ट विमानतळांना भेट देण्याची संधी मिळाली, तर हा अत्यंत स्मरणीय आणि अनोखा अनुभव असू शकेल. विविध शहरांमधील ही विमानतळे आहेत, ज्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध आहेत. जगातील अशाच काही सर्वोत्कृष्ट विमानतळांची माहिती या ठिकाणी देत आहोत...

Best Airports in the World | जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळे

जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळे

ंगी विमानतळ, सिंगापूर
बगीचे, पोहण्याचा तलाव आणि विक्री दुकाने या व्यतीरिक्त या ठिकाणी प्रवाशांना अनोखा अनुभव येतो, तो म्हणजे नैसर्गिक माग आणि फुलपाखरांचे बगीचे. तुम्ही जर काही वेगळे अनुभवू इच्छिता, तर टर्मिनल ३ येथे कॉर्कस्क्रू राईड करता येते, जी चार मजली आहे. नक्कीच जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळापैकी एक आहे.

दुबई आंतरराष्टÑीय विमानतळ
मॉल, पंचतारांकित हॉटेल, स्पा आणि झेन गार्डनही या विमानतळावर आहे.

हाँगकाँग आंतरराष्टÑीय विमानतळ
या ठिकाणी विमानचालन संशोधन केंद्र, गोल्फ कोर्स, चहा तयार करण्याची पद्धत, शैक्षणिक पार्क, कला आणि संस्कृतीचे दालन आहे. या ठिकाणी युए आयमॅक्स ३ डी थिएटरही आहे.

इंचेओन आंतरराष्टÑीय विमानतळ, दक्षिण कोरिया
जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळापैकी एक. या ठिकाणी स्केटींग रिंक आहे, ज्याला आईस फॉरेस्ट असे म्हटले जाते. जॅझ आणि बी-बॉय सारख्या मनोरंजनाच्या सोयी देखील उपलब्ध आहेत. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि दागिन्यांचे बगीचेदेखील आहेत.

मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ
खास सुविधा जरी नसल्या तरी तुमच्या डोळ्याला मनोहारी वाटेल असे बरेच काही या विमानतळावर आहे. सांस्कृतिक परिसरात तुम्हाला भारतामधील अतुल्य गोष्टींची माहिती मिळू शकते.

म्युनिच विमानतळ, जर्मनी
तुम्हाला या ठिकाणी मद्यालय, गोल्फ कोर्स, बिअर हॉल, टर्मिनल दरम्यान लाईव्ह बँड आणि म्युनिच विमानतळावर संग्रहालय देखील पहावयास मिळेल.

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्टÑीय विमानतळ, कॅलिफोर्निया
तुमच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर तुम्ही या विमानतळावर योगा रुमध्ये जाऊन काही वेळ ध्यान करु शकता.

शिपॉल आंतरराष्टÑीय विमानतळ, अ‍ॅम्स्टरडॅम
या विमानतळावर तुम्ही अ‍ॅमस्टरडॅम शहर पाहू शकता. कॅसिनो आणि ध्यान केंद्रही आहे.

Web Title: Best Airports in the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.