हॉलीवुड अभिनेता बेन एफ्लेकचे म्हणणे आहे की, त्याची पहिली पत्नी जेनिफर गार्नेर आजही त्याची चांगली मैत्रिण आहे. कारण आमच्या तीन मुलांच्या भवितव्यासाठी आमच्यात चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे.
घटस्फोटानंतरही बेन-जेनिफर बेस्ट फ्रेंड
/>हॉलीवुड अभिनेता बेन एफ्लेकचे म्हणणे आहे की, त्याची पहिली पत्नी जेनिफर गार्नेर आजही त्याची चांगली मैत्रिण आहे. कारण आमच्या तीन मुलांच्या भवितव्यासाठी आमच्यात चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. बेन आणि जेनिफरला वॉएलेट (१०), सेराफिना (७) आणि सॅमुअल (४) अशी तीन मुले आहेत. गेल्या वर्षी दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोघांवरही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे.