स्पॉटलाईट ठरले... बेस्ट पिच्चर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 00:41 IST
आॅस्कर अॅवॉर्डमध्ये एखाद्या चित्रपटाला नॉमिनेशन जरी मिळाले तरी त्यांच्या संपुर्ण टिमसाठी ती मोठी भाग्याची गोष्ट समजली जाते. परंतू ज्यावेळी अॅवॉर्ड मिळण्याची वेळ
स्पॉटलाईट ठरले... बेस्ट पिच्चर
आॅस्कर अॅवॉर्डमध्ये एखाद्या चित्रपटाला नॉमिनेशन जरी मिळाले तरी त्यांच्या संपुर्ण टिमसाठी ती मोठी भाग्याची गोष्ट समजली जाते. परंतू ज्यावेळी अॅवॉर्ड मिळण्याची वेळ येते तेव्हा मात्र धडधड वाढते आणि आपल्यालाच तो अॅवॉर्ड मिळावा अशी मनोमन प्रतिक्षा केली जाते. यंदाच्या ८८ व्या अॅकॅडमीक अॅवॉर्डमध्ये बेस्ट पिच्चर अॅवॉर्ड स्पॉटलाईट चित्रपटाला मिळाले. या अॅवॉर्डसाठी नॉमिनेशनमध्ये द बिग शॉर्ट, ब्रिज आॅफ स्पाईस, ब्रुकलीन, द मार्टीन, द रिवेनन्ट, रुम, मॅड मॅक्स : फरी रोड हे चित्रपट रेसमध्ये होते. परंतू स्पॉटलाईटने या सर्वांना मागे सोडुन बेस्ट पिच्चर अॅवॉर्ड पटकावून बाजी मारली.