सुंदर पिचाई यांचे 4 सिक्रेटस्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:12 IST2016-01-16T01:08:06+5:302016-02-11T08:12:50+5:30
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या बाबतीत काही गोष्टी अशा आहेत, ज्या खुद्द त्यांच्या कंपनीलाही ठाऊक ना...

सुंदर पिचाई यांचे 4 सिक्रेटस्
ग गलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या बाबतीत काही गोष्टी अशा आहेत, ज्या खुद्द त्यांच्या कंपनीलाही ठाऊक नाहीत. अलीकडेच दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हर्षा भोगले यांनी त्यांची जाहीर मुलाखत घेतली. यातून पिचाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नवनवीन पैलू उलगडत गेले.
१) पिचाई हे चेन्नईमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांच्या खाण्याविषयी काही आवडी निवडी आहेत. पयसमची चव कमी गोड व्हावी यासाठी ते त्यात सांभार मिक्स करतात.
२. पिचाई यांनी आयआयटी खडगपूर येथे शिक्षण घेतले आहे. ते चेन्नई ते खडगपूरला जाण्यासाठी कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करीत असत. गुगल आणि भारतीय रेल्वेत स्थानकांना मोफत वाय फाय सेवा देण्यावरून एकमत होऊ शकले नाही. खडगपूर हे देशातील सर्वांत मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. प्रवासी सामान घेऊन चुकून विरुद्ध टोकाला गेला तर त्याला दुसर्या टोकाला पोहोचण्यासाठी खूप कसरत करावी लागते. वाय फाय सेवा असती तर असा घोळ होण्याची शक्यता कमी असते, असे त्यांचे म्हणणे आहे.
३. एकदा डायल केलेला दूरध्वनी क्रमांक पिचाई यांना तोंडपाठ असतो. ते भारतात असताना दूरध्वनी क्रमांक सहा अंकांचे होते. त्यावेळी गुगल अस्तित्वात यायचे होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना कुणाचा दूरध्वनी क्रमांक हवा असल्यास ते पिचाई यांना विचारत असत. पिचाई यांनी एकदा ऐकलेले किंवा डायल केलेले क्रमांक कायम लक्षात ठेवण्याची सवय पूर्वीपासूनच आहे.
४. पचाई अमेरिकेला गेले आणि बर्याच गोष्टी बदलल्या. तिथे दूरध्वनी क्रमांक १0 अंकी असत. पुढे मोबाइलमध्ये क्रमांक सेव्ह करून ठेवण्याची सवय लागली आणि पिचाई यांची ही सवय कायमची तुटली.