सुंदर व एक्सक्लुसिव्ह ज्वेलरी म्हणजे 'इंट्रिया"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:18 IST2016-01-16T01:15:53+5:302016-02-06T11:18:22+5:30
आवडीला डिझाईन्समध्ये परावर्तित करण्याचा विचार
.jpg)
सुंदर व एक्सक्लुसिव्ह ज्वेलरी म्हणजे 'इंट्रिया"
प्रश्न : ज्वेलरी डिझाईन्सकडे आपण कशा आकर्षित झालात?
पूर्वा कोठारी : मला सुरुवातीपासूनच दागिणे, अलंकारांची आवड व आकर्षण होते. दरम्यान माझ्या आवडीला डिझाईन्समध्ये परावर्तित करण्याचा विचार केला. यातूनच माझ्या कल्पनांना आकार मिळत गेला.

प्रश्न : ज्वेलरी डिझाईन्सच्या नव्या कल्पना तुम्हाला कशा सुचतात?
पूर्वा कोठारी : निसर्गातून. मी नेचर लव्हर आहे. फुले, पाणे, वनस्पतीवर माझे प्रेम आहे. माझ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला याचा प्रभाव जाणवेल.
प्रश्न : इंट्रियाचे प्रदर्शन आतापर्यंत कुठे-कुठे लागले आहे?
पूर्वा कोठारी : देशातील सर्व मेट्रो शहरात मी कित्येकदा हे प्रदर्शन लावले आहे. मुंबई, नागपूर, दिल्ली, अहमदाबाद, बेंगळूरुसह जवळपास सर्वच शहरापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. या सर्व ठिकाणांहून मिळणारा प्रतिसाद सर्वोत्तम म्हणावा असाच आहे.
प्रश्न : नागपुरात मागील कित्येक वर्षांपासून इंट्रिया प्रदर्शन लावण्यात येते. येथे लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे?
पूर्वा कोठारी : खरोखरच सर्वांत चांगला आहे. मागील सात वर्षांपासून आम्ही या शहरात प्रदर्शन लावत आहोत. मला वाटते आम्ही ग्राहकांच्या मनापर्यंत पोहचलो आहोत. त्यांचा विश्वासही आम्ही संपादन केला आहे. हाच ट्रस्ट फॅक्टर आमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. जुणे कस्टर्मस हे या प्रदर्शनात नाविण्य शोधायला येतात, शिवाय नवीन ग्राहक ांची संख्या देखील बरीच मोठी आहे.

प्रश्न : दागिण्यांच्या बाबतीत नागपूरकरांची काही खास चॉईस आहे का?
पूर्वा कोठारी : माझ्या अनुभवानुसार नागपुरातील लोकांना लहान आयटम्स जास्त पसंत पडतात. हे असे दागिणे आहेत जे ते रोज घालू शकतात. जसे रिंग्स, ईअर रिंग्स, लॉकेट्स इत्यादी. एखाद्या खास प्रसंगासाठी भारी दागिणेदेखील त्याच्या पसंतीस उतरतात. लग्नासाठी डायमंड्स, रुबी, सफायर आणि अन्य रत्नांची नागपुरीयन्स खरेदी करीत असतात.
प्रश्न : शहरातील लोकांसाठी कलेक्शन सादर करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देता काय?
पूर्वा कोठारी : होय, नक्क ीच! दरवर्षी आम्ही दिवाळीपूर्वी येथे येतो. या उत्सवासाठी आम्ही जास्तीत जास्त व्हेरियेबल आयटम्स सादर करतो. लग्नांचा मौसमही जवळच आलेला असतो. त्यामुळे आम्ही सुंदर ब्रयाडल सेट्सखा यात समावेश करतो.
प्रश्न : यावेळीच्या कलेक्शनमध्ये नवे काय पहायला मिळेल?
पूर्वा कोठारी : प्रत्येक वेळी आमचे डिझाईन्स नवे असतातच. आम्ही आमच्या डिझाईन्सला रिपिट करीत नाही हे इंट्रियाचे वैशिष्ट्य आहे. यावेळी आमच्याकडे पर्ल्स दागिण्यांची नवी रेंज असेल. याशिवाय रुबीज व पिंक गोल्डचे काही खास आयटम्स असणार आहेत. आम्ही मिक्स अँण्ड मॅच व इंडो-वेस्टर्न कल्चरला ध्यानात ठेऊन नवे कलेक्शन सादर केले आहे.
प्रश्न : डायमंड्स किंवा ज्वेलरीविषयी आपण बोलतो तेव्हा रीच व हायक्लासच ध्यानात येतो. मिडल क्लास लोकांसाठी या एक्झीबेशनमध्ये काय असेल?
पूर्वा कोठारी : येथे मला सांगावसे वाटते की, इंट्रियाची ज्वेलरी जास्त महाग नाही. तुम्हाला मोठय़ा शोरूम्सपेक्षा आमच्याकडे कमी किमतीत उत्कृष्ट डिझायनर ज्वेलरी मिळू शकेल. आमच्या आयटम्सची सुरुवात 50 हजारांपासून होते.
प्रश्न : नागपूरकरांना काही सांगावेसे वाटते?
पूर्वा कोठारी : नक्कीच, मला वाटते हे प्रदर्शन सर्वांनी जरुर पहावयास हवे. कारण यात सर्वांसाठी काही न काही नवे असतेच. आम्ही खूप मेहनत करून डिझाईन्स तयार करतो. त्यामुळे आमचे काम लोकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे. सुंदर व एक्सक्लुसिव्ह ज्वेलरी म्हणजे