सावधान! हे चार अॅप करा त्वरित डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 14:39 IST2016-12-14T14:39:24+5:302016-12-14T14:39:24+5:30
स्मार्टफोन म्हणजे अॅपचा खजिनाच असतो. याद्वारे आपण विविध माहिती गोळा करु शकतो, विविध प्रकारचे गेम्स खेळू शकतो शिवाय म्युझिक, व्हिडिओचा आनंद घेऊ शकतो.
.jpg)
सावधान! हे चार अॅप करा त्वरित डिलीट
स मार्टफोन म्हणजे अॅपचा खजिनाच असतो. याद्वारे आपण विविध माहिती गोळा करु शकतो, विविध प्रकारचे गेम्स खेळू शकतो शिवाय म्युझिक, व्हिडिओचा आनंद घेऊ शकतो. तसेच शिक्षण किंवा अन्य क्षेत्रासंबंधी माहितीही सहज उपलब्ध करु शकतो. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने स्मार्टफोनमधील एमपीजंक (म्यूजिक अॅप), टॉकिंग फ्रॉग (एंटरटेन्मेंट अॅप), टॉप गन (गेम अॅप) आणि व्हिडीजंक (व्हिडिओ अॅप) हे चार अॅप तातळीने डिलीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाकिस्तानी यंत्रणा या चार अॅपच्या माध्यमातून मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करुन महत्त्वाची माहिती गोळा करीत असल्याचा अहवाल गृह मंत्रालयाला मिळाला आहे.
पाकिस्तानी यंत्रणा या चार अॅपच्या माध्यमातून मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करुन महत्त्वाची माहिती गोळा करीत असल्याचा अहवाल गृह मंत्रालयाला मिळाला आहे.