​कामाच्या ठिकाणी हे टाळाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 15:17 IST2016-12-11T15:16:46+5:302016-12-11T15:17:39+5:30

आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध कार्यालयात काम करीत आहे. कार्यालयात आपण कसे वागतो यावरुन आपली ओळख निर्माण होते. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी आपण अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्या व इतरांच्या कामात अडथळा निर्माण होतो.

Avoid This at Work! | ​कामाच्या ठिकाणी हे टाळाच !

​कामाच्या ठिकाणी हे टाळाच !

ong>-Ravindra More

आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध कार्यालयात काम करीत आहे. कार्यालयात आपण कसे वागतो यावरुन आपली ओळख निर्माण होते. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी आपण अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्या व इतरांच्या कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपणास माहिती असायला हवे की, कामाच्या ठिकाणी कसे वागावे. आजच्या सदरात नेमक्या कोणत्या गोष्टी करु नयेत याबाबत जाणून घेऊया. 

व्यक्तिगत गप्पा टाळा
प्रत्येक कार्यालयात काही नियम असतात आणि नियमानुसार काही व्यावसायिक गोष्टीदेखील असतात. आपल्याला कार्यालयात त्या नियमांचे पालन करावे लागते. बऱ्याचदा काही लोक कार्यालयात व्यक्तिगत आयुष्यातील अडचणींवर गप्पा मारताना दिसतात. यावेळी आपल्या शेजारील सहकाऱ्याला त्रास होतोय याचेही भान नसते. महिला आणि पुरुष दोन्हीही असे करताना दिसतात. 

नात्यांविषयी कमी बोला
आपण बऱ्याचदा आपले कुटुंब, सासर, मुले, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यांच्याविषयी सहकाºयांशी बोलत असतो. यात चुकीचे काहीच नाही. मात्र संबंधित विषयाचे विचार आपल्या मनात घुमायला लागतात आणि कामावर या चर्चेचा प्रतिकूल परिणाम जाणवतो. त्यामुळे तुम्हाला त्रासदेखील होऊ शकतो. 

सल्ला देणे टाळा
आपण नेहमी आपल्या सहकाऱ्याला त्याच्या कामाच्या बाबतीत सल्ला देण्याच्या प्रयत्नात असतो. बहुदा एखादी महिला तिचे घर, कुटुंब आदीविषयी चर्चा करीत असेल तर दुसरी महिला लगेच तिचा निर्णय किंवा सल्ला देण्याच्या पावित्र्यात असते. कधी कधी तर समोरचीचा मेकअप आणि कपडे पाहून तिचा स्वभाव कसा आहे ते ठरविते. तर कधी त्यांची नजर, चालण्या बोलण्याच्या पद्धतीत चुका शोधते. जरी हा चांगला विरुंगळा वाटत असला तरी कामाच्या ठिकाणी तो योग्य वाटत नाही.

तुमची नावड जाहीर करु नये
बऱ्याचदा आपल्या सोबत काम करणारे काही सहकारी आपल्याला आवडत नाहीत. ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र ही गोष्ट लोकांमध्ये जाहीर न करता ती तुमच्यापर्यंतच ठेवा. आॅफिसमध्ये व्यवहारिक संबंध ठेवणे गरजेचे असते. 

भावनिक होणे टाळा
कार्यालयात काम करीत असताना बऱ्याचदा आपले इतरांशी भावनिक नाते तयार होते. विशेषत: पुरुषांच्या तुलनेने महिलांच्याबाबतीत हे जास्त घडते. परंतु कुणाच्या समोर भावनिक होणे चांगले नाही. यामुळे आॅफिसमध्ये चुकीचे संदर्भ निघू शकतात.  म्हणजे कोणी जर आॅफिस सोडून जात असेल तर रडणे चुकीचे आहे.

बॉस पसंत असेल तर...
तुमचा बॉस सुंदर आहे आणि त्यामुळे आपण चांगले काम करता, म्हणजेच तुम्ही बॉसला पसंत करीत असाल तर ही गोष्ट बॉसला कधीच कळू देऊ नका. बॉसच्या समोरही नेहमी सामान्य राहा. कारण त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

जास्त मेकअप नको
आॅफिसमध्ये नेहमी जास्त मेकअप नको. आॅफिसमध्ये आकर्षक दिसण्यासाठी नेहमी हलकाच मेकअप करावा. जास्त मेकअप केल्याने आपल्या व्यक्तित्त्वाची वेगळी छाप पडते. विशेष म्हणजे जास्त मेकअप तुमचे सौंदर्य वाढवत नाही. 

जास्त मैत्री नको
आॅफिसमध्ये कुणाशी जास्त मैत्री ठीक नसते. सहकाऱ्याशी जास्त मैत्री वाढली की, व्यक्तिगत याचा आॅफिस कामावर नक्कीच परिणाम होत असतो. त्यामुळे मैत्रीसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करा. 

Web Title: Avoid This at Work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.