​झोप टाळून ‘व्हिडियो गेम’ खेळण्याचा खुळा नाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 22:44 IST2016-06-14T17:14:21+5:302016-06-14T22:44:21+5:30

गेमर्स अधिकवेळ गेम खेळण्यासाठी झोपायला सुमारे शंभर मिनिटे उशिर करतात.

Avoid sleep and open sounds to play 'Video Game' | ​झोप टाळून ‘व्हिडियो गेम’ खेळण्याचा खुळा नाद

​झोप टाळून ‘व्हिडियो गेम’ खेळण्याचा खुळा नाद

हिडिओ गेम आणि मुलं यांना एकमेकांपासून दूर करणे महाकठिण काम आहे. परंतु या व्हिडिओ गेमच्या व्यसनापायी मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकते नुकतेच झालेल्या एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, गेमर्स अधिकवेळ गेम खेळण्यासाठी झोपायला सुमारे शंभर मिनिटे उशिर करतात. व्हिडिओ गेमचे व्यसन ‘अ‍ॅडिक्टिव्ह बिहेव्हिएर’ म्हणून घोषित करण्याची मागणीदेखील संशोधकांनी केली आहे.

स्टडीनुसार, गेमर्स आठवड्याला सरासरी 4.6 रात्री गेम खेळतात. त्यांपैकी 36 टक्के रात्री ते झोपायला मुद्दामहून उशिर करतात.

युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटर येथील सहायक प्राध्यापक ब्रँडी रोअने यांनी माहिती दिली की, झोपेला टाळाटाळ करण्यापाठी कोणतेकोणते घटक कारणभूत असतात यासंबंध संशोधन करताना व्हिडिओ गेमबाबात ही वस्तूस्थिती समोर आली. सुमोर 67 गेमर्स झोपायला उशिर करतात आणि अपुऱ्या झोपेचे शिकार होतात.

या संशोधनामध्ये सरासरी वय 28.7 असलेल्या 963 गेमर्सचा अभ्यास करण्यात आला. डेमोग्राफिक्स, गेमिंग कन्सोल, गेम्सचे प्रकार, गेम खेळण्याची वारंवारिता व एकूण वेळ यासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

झोपेला उशिर करण्यामागचे कारण स्पष्ट करताना सहभागी गेमर्सनी दिलेल्या उत्तरांवरून तर ‘व्हिडिओ गेम्स’चा ‘अ‍ॅडक्टिव्ह बिहेव्हिएर’मध्ये सामावेश करायला हवा या मताला संशोधकांनी समर्थन केले आहे. ‘स्लीप’ नावाच्या जर्नलमध्ये संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.

Web Title: Avoid sleep and open sounds to play 'Video Game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.