स्टिव्ह जॉब्सच्या वस्तूंचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 03:26 IST2016-02-26T10:26:40+5:302016-02-26T03:26:40+5:30

स्टीव्ह जॉब्स च्या वैयक्तिक वस्तूंच्या लिलावाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

Auction of Steve Jobs items | स्टिव्ह जॉब्सच्या वस्तूंचा लिलाव

स्टिव्ह जॉब्सच्या वस्तूंचा लिलाव

‍ॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्सचे व्यक्तीमत्त्वच निराळे होते. तंत्रज्ञानात क्रांती आणणाऱ्या स्टीव्ह जॉब्सचे आजही लोकांना प्रचंड आकर्षण आहे. म्हणूनच तर त्यांच्या वैयक्तिक वस्तूंच्या लिलावाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

1984 साल मॅकेंतोश फोटोशूटच्या वेळी त्याने घातलेल्या ‘सिएको’ कंपनीच्या घडीला सुमारे 42.5 हजार डॉलर्स एवढी घसघशीत किंमत मिळाली. घडीचा बेल्ट जीर्ण झालेला असूनही 14 लोकांनी त्यासाठी बोली लावली होती.

या घडीसोबतच जॉब्सचे बर्केनस्टॉक सँडल, ‘नेक्स्ट’चा लोगो असलेले काळ्या रंगाचे टर्टल नेक, बिझनेस कार्ड, नेक्स्ट (ठएळ) नेम टॅग, 10 कॅरेट गोल्ड अ‍ॅपल पेन आणि त्याने सही केलेली यूएसपीएस रिसिट या आॅनलाईन लिलावात विक्रीला होती.

seiko

सँडलला 2750 डॉलर्स, टर्टलनेकसाठी 7500 डॉलर्स तर इतर वस्तूंना 16,250 डॉलर्स एवढी किंमत मिळाली. ऐंशीच्या दशकात जॉब्सच्या अ‍ॅल्बनी प्रॉपर्टीचा एस्टेट मॅनेजर मार्क शेफच्या वैयक्तिक संग्रहातील या वस्तूंचा लिलाव करण्यात आला.

Web Title: Auction of Steve Jobs items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.