​प्रिन्सच्या कपड्यांचा १.३४ कोटींमध्ये लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:18 IST2016-07-05T13:48:18+5:302016-07-05T19:18:18+5:30

प्रिन्सचा ‘पर्पल रेन’ ड्रेसचा सुमोर दोन लाख डॉलर्समध्ये (१.३४ कोटी रु.) लिलाव झाला.

Auction of Prince's clothes worth 1.34 crore | ​प्रिन्सच्या कपड्यांचा १.३४ कोटींमध्ये लिलाव

​प्रिन्सच्या कपड्यांचा १.३४ कोटींमध्ये लिलाव

कस्टार प्रिन्सच्या निधनानंतर त्याच्याशी निगडित वस्तूंना चाहते हातोहात खरेदी करतान दिसत आहेत. आपल्या लाडक्या गायकाच्या आठवणी जवळ बाळगण्यासाठी चाहते वाटेल ते किंमत मोजण्यास तयार आहेत. आता हेच पाहा ना. प्रिन्सचा ‘पर्पल रेन’ ड्रेसचा सुमोर दोन लाख डॉलर्समध्ये (१.३४ कोटी रु.) लिलाव झाला.

‘पपर्ल रेन’ या १९८४ साली आलेल्या चित्रपटात त्याने घातलेला पांढरा शर्ट आणि  ब्लॅक अँड व्हाईट जॅकेटसाठी प्रत्येकी ९६ हजार डॉलरची भरमसाठ बोली लागली. लिलावाच्या सुरुवातीला याच शर्टची तीन ते पाच हजार डॉलर तर जॅकेटची सहा ते आठ हजार डॉलर एवढी किमान किंमत ठेवण्यात आली होती.

चित्रपटात प्रिन्सने सहअभिनेत्री अपोलोनिया कोटेरोसोबत मोटरसायकल राईड मारताना हा शर्ट घातला होता. एक मेकअप आर्टिस्टला शुटिंगनंतर हा शर्ट देण्यात आला होता. ‘प्रोफाईल्स इन हिस्ट्री’तर्फे करण्यात आलेल्या या लिलावाबाबत सांगतान संस्थापक जो मॅडेलना यांनी सांगितले की, जॅकेटचा लिलाव प्रिन्सच्या निधनापूर्वी एप्रिल महिन्यात करण्यात येणार होता.

लिलावात ‘पर्पल रेन’ टूर वर प्रिन्सने घातलेल्या एका शर्टला ३२ हजार डॉलर्स, लव्हसेक्सी (१९८८) टूरमधील बुटासाठी १७,९२० डॉलर्स आणि ‘डायमंड्स अँड पर्ल्स’ म्युझिक व्हिडिओमध्ये घातलेल्या नेकलेसला ८३२० डॉलर्स एवढी किंमत मिळाली. परंतु हे सर्व कोणी खरेदी केले याची माहिती लिलावसंस्थेने जाहीर करण्यास नकार दिला.

मागच्या महिन्यात प्रिन्सच्या ‘यलो क्लाऊड’ गिटार अमेरिकन फुटबॉल टीम ‘इंडियानापोलिस कोल्ट्स’चा मालक जिम आयर्से यांनी १.३७ लाख डॉलर्समध्ये (९३ लाख रु.) खरेदी केली होती.

Web Title: Auction of Prince's clothes worth 1.34 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.