‘फोर्ड जीटी40’ कारचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:45 IST2016-03-03T11:05:18+5:302016-03-03T04:45:46+5:30

 पुढच्या महिन्यात ‘फोर्ड जीटी४०’ कारचा लिलाव होणार आहे. १९६६च्या या मॉडेलचा गुडिंग अँड कोतर्फे अमेलिया आयलँड येथे लिलाव होणार आहे.

Auction of 'Ford GT40' car | ‘फोर्ड जीटी40’ कारचा लिलाव

‘फोर्ड जीटी40’ कारचा लिलाव

रप्रेमींसाठी खूश खबर आहे. पुढच्या महिन्यात ‘फोर्ड जीटी४०’ कारचा लिलाव होणार आहे. १९६६च्या या मॉडेलचा गुडिंग अँड कोतर्फे अमेलिया आयलँड येथे लिलाव होणार आहे. सुमारे ३ मिलियन डॉलर्स किंमत मिळण्याची शक्यता आहे.

1967 साली प्रथम ही कार टेक्सासमधील एका व्यक्तीने खरेदी केली होती. त्यानंतर अनेक वेळा तिची विक्री झाली. अनेक वेळा रिपेंटदेखील करण्यात आले. मात्र, फार कमी वेळा (केवळ ४.८ हजार किमी ) ती चालविण्यात आलेली आहे. निरभ्र आकाशाप्रमाणे निळ्या रंगाची ही स्ट्रीट कार पाहताच मन मोहून घेते.

289 क्युबिक इंच व्ही8 इंजिन 390 हॉर्सपॉवर एवढी शक्ती निर्माण करते. ट्विन चोक वेबर कार्ब्युरेटर्स आणि जीटी40 मॉडेलचे आयकॉनिक हेडर्समुळे कारचा लूक एकदम कूल आणि स्टाईलिश आहे. म्हणूनच तर या जून्या कारच्या किंमतीमध्ये नवीन आठ कार घेता येऊ शकत असतानाही लोकांना या मॉडेलच आकर्षण आहे.

ford gt40

Web Title: Auction of 'Ford GT40' car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.