मुलींना आकर्षीत करण्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 05:03 IST2016-01-16T01:10:41+5:302016-02-10T05:03:19+5:30
पेट असलेल्या मुलांकडे मुली होतात आकर्षित मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं काय काय नाही करत.

मुलींना आकर्षीत करण्यासाठी...
्रँडेड कपडे, स्टाईलिश गॉगल, स्पोर्ट्स बाईक, स्मार्टफोन अशा गोष्टींचा त्यात समावेश असतो. मुली गॅजेट्सवर नाही तर पाळीव प्राण्यांवर भाळतात. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून असे दिसून आले की पाळीव प्राणी असलेल्या मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. म्हणून तुम्हालाही जर जीवनसाथी मिळवायचा असेल तर लवकरात लवकर कुत्रा किंवा मांजर पाळा. आयुष्याचा जोडीदार हा प्रेमळ, काळजी घेणारा, संवेदनशील असावा अशी साधारणत: मुलींची अपेक्षा असते. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे याचा अर्थ तुम्ही मुक्या प्राण्यांची काळजी करता, त्यांच्याकडे लक्ष देता, असा त्याचा अर्थ त्या काढत असतात. त्यामुळे कदाचित मुली पेट असेलेल्या मुलांकडे जास्त आकर्षित होत असाव्यात असे संशोधकांना वाटते. लैंगिक आरोग्यतज्ज्ञ दीपक जुमानी सांगतात की, 'मुलांच्या दिसण्यापेक्षा त्यांची भावनिक बाजू मुलींना जास्त महत्त्वाची वाटत असते. त्यामुळे मुलींना अशी मुलं आवडतात.