जॅकी चॅनने घेतले आलिशान विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:36 IST2016-02-10T07:58:19+5:302016-02-10T13:36:01+5:30
मार्शल आर्ट सुपरस्टार जॅकी चॅनने एक आलिशान बिझनेस जेट विमान विकत घेतले आहे.

जॅकी चॅनने घेतले आलिशान विमान

एम्बे्रयर लेगसी ५०० असे त्या विमानाचे नाव असून चीनमध्ये असे विमान विकत घेणारा तो पहिला माणूस ठरला आहे. या विमानाची किंमत २० मिलियन डॉलर्स (१२० कोटी रु.) इतकी आहे. ‘एम्बे्रयर एक्झिक्युटिव्ह जेट्स’चे सीईओ आणि अध्यक्ष मार्को टुलियो पेलेग्रिनी यांनी सांगितले की, ‘लेगसी ५०० हे आतापर्यंतचे सर्वात अद्ययावत कॉर्पोरेट जेट आहे. दिसायला एकदम स्टायलिश आणि प्रवाशांच्या आरामाची सर्वोत्तम सोय व इंधनबचतीमध्येही उत्कृष्ट आहे. साईड स्टीक कंट्रोल असलेले हे त्याच्या आकारातील पहिले आणि एकमेव विमान आहे.

’ सहा फूट उंच या विमानातून १२ प्रवासी प्रवास करू शकतात. यामध्ये कॅबिन मॅनेजमेंट सिस्टिम, सराऊंड साऊंड, हाय-डेफिनेशन एंटरटेनमेंट, आठ क्लब सीट्स जे ४ पलंगामध्ये रुपांतरित होतात अशा अनेक आरामदायी सुविधा आहेत. केवळ चार हजार फूट लांबीच्या धावपट्टीवरूनही लेगसी ५०० उड्डाण करू शकते. चार प्रवाशासोबत या विमानाची रेंज ५,७८८ इतकी आहे.

४५ हजार फूट उंचावरून उडणाºया लेगसी ५०० मध्ये हनीवेल एचटीएफ७५००ई इंजिन लावण्यात आलेले आहे. इकोफे्रंडली इंजिन म्हणून ते ओळखले जाते. ‘हे विमान घेतल्यामुळे मी फार एक्सायटेड आहे. अशा प्रकारचे पहिलेच विमान मी विकत घेतले याचा आनंदसुद्धा वेगळा आहे’, असे जॅकी चॅन सांगतो.

.jpg)