​महिलांना सर्वाधिक आवड ‘एअररिंग्ज’ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 20:22 IST2016-05-18T14:52:46+5:302016-05-18T20:22:46+5:30

आॅनलाईन सर्वेक्षणातून समोर आले की, कानातले घालणे महिलांना सर्वाधिक आवडते.

Arrangements of women most liked | ​महिलांना सर्वाधिक आवड ‘एअररिंग्ज’ची

​महिलांना सर्वाधिक आवड ‘एअररिंग्ज’ची

कअप आणि सजण्याची आवड नसलेल्या महिला शोधूनही सापडणार नाहीत. त्यातल्या त्यात दागिन्यांमध्ये महिलांचा जीव की प्राण.

परंतु असा कोणता दागिना आहे जो महिलांना सर्वात जास्त आवडतो.

एका आॅनलाईन शॉपिंग वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले की, कानातले घालणे महिलांना सर्वाधिक आवडते. 

सहभागी झालेल्या सुमारे 39 टक्के महिलांनी एअररिंग्जला पसंती दर्शवली. त्यांपैकी सुमारे 70 टक्के महिलांनी झुमके, हुप्स, झुंबर, डँगलिंग क्लिप-आॅनला घालणे सर्वाधिक आवडते असे सांगितले.

केवळ 30 टक्के महिलांना स्टड्स किंवा एअर-पिन्स आवडतात. यानंतर महिला गळ्यातले, टिकली आणि बांगड्यांना प्राधान्य देतात.

या सर्व्हेमध्ये महिलांना विविध प्रकारच्या फॅशन अ‍ॅक्सेसरीज्चा पर्याय देण्यात आला होता. महिलांना त्यांपैकी प्राधान्यक्रम द्यायचा होता. कान टोचणे ही बहुतांश भारतीय कुटुंबांमध्ये प्रथा आहे.

आता कान टोचणे पूर्वीसारखे त्रासदायक राहिलेले नाही. बाळ लहान असतानाच घरातील मोठे सदस्य बाळाचे कान टोचून सोन्याचे कानातले बनवून घेतात. त्यामुळे लहानपणापासूनच कानातल्या दागिन्यांचा संबंध येतो.

Web Title: Arrangements of women most liked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.