रिलेशनशिपमध्ये आहात का? आपल्यासाठी या आहेत खास ‘१०’ टिप्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 17:54 IST2017-04-29T12:24:56+5:302017-04-29T17:54:56+5:30
बऱ्याचदा प्रेमविरांचा काही ना काही कारणाने ब्रेकअप होतो आणि संपूर्ण हिरमोड होतो. असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत.
.jpg)
रिलेशनशिपमध्ये आहात का? आपल्यासाठी या आहेत खास ‘१०’ टिप्स !
‘एक क्षण पूरे प्रेमाचा...’ असे म्हटले जाते. खरच किती विलोभनिय क्षण असतात जेव्हा आपण प्रेमात असतो. आपल्यावर प्रेम करणार कोणीतरी आहे आणि काहीही झालं तरी ती व्यक्ती आपल्याबरोबरच राहणार हा विचारच खूप समाधान देणारा आहे. मात्र बऱ्याचदा प्रेमविरांचा काही ना काही कारणाने ब्रेकअप होतो आणि संपूर्ण हिरमोड होतो. असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत.
* तिच्या आवडी निवडींचा, तिने केलेल्या सुचना अथवा महत्त्वाच्या गोष्टीं सकारात्मक प्रतिसाद द्या. तिला आवडत असलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल जर ती बोलत असेल तर तिला मनभरून बोलू द्या आणि मन लावून ऐका.
* ती अचानक तुमच्यापासून दुर रहात असेल तर तिला तुमच्यातील या दुराव्याची जाणिव होऊ देऊ नका. यासाठी त्या दरम्यान तिला आपले फोटो पाठवा.
* रिलेशनशिपमधील इमोशनल इन्व्हेस्टमेंट आणि पार्टनरप्रती असलेली आॅनेस्टी, डेडिकेशन हे आपलं प्रेम टिकवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं हे लक्षात ठेवा.
* रिलेशनमध्ये जर दुरावा निर्माण झाला असेल तर त्याची कारणं शोधा. तुमची चूक असेल तर त्वरित माफी मागा.
* रिलेशनशिप म्हणजे चॅटिंग, कॉलिंग आणि याच माध्यमातून तिला आपले प्रॉब्लेम्स शेअर करणे नव्हे, रिलेशनशिपमध्ये आल्यावर तिला लॉंग ड्राइव्हवर घेऊन जा. निवांत क्षणी तिच्या समस्यांबद्दल विचारपुस करा. प्रत्येकवेळी स्वत:च्या गोष्टींना महत्त्व देत बसू नका.
* तिच्यासोबत तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी तिला पुर्ण स्वातंत्र्य द्या. तुम्हाला तिच्या छंदांबद्दल माहिती असली पाहिजे. तिला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करा. मुलींना असेच मुलं आवडतात.
* आपल्यातील समर्पणाची भावना वाढवा. समर्पणाची भावना वाढवणे म्हणजे स्वत:चं अस्तित्त्व विसरणे असं होत नाही. समर्पणाची भावना वाढवणे म्हणजे तिच्या छोट्या मोठ्या चुकांना विसरून त्याबद्दल कधीही विषय काढू नका. यातून तुमचा समजुतदारपणा दिसतो. अशा मुलांना सोडण्याची इच्छा कधीच कुठली मुलगी करू शकत नाही.
* तुमच्या नात्यातील गोडवा कायम टिकून राहण्यासाठी कधी कधी तिच्यासोबत मनभरून फ्लर्ट करा. यातून तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
* तिच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्तींनाही तितकच महत्त्व द्या. यामुळे तिच्या मनात तुम्ही अधिक जागा बनवाल.
* कधी कधी तिला छोटंस लव्ह लेटर लिहा. तुमच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हे तुमच्या शब्दात त्या लेटरमध्ये लिहा.
Also Read : OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !
: SHOCKING : ‘ब्रेक-अप’ होण्याची आहेत ही १० कारणे !