पार्टीसाठी चिमुकल्यांची तयारी करता आहात का? मग त्यांना पॉम पॉम आणि टू टू घाला!
By Admin | Updated: May 9, 2017 17:50 IST2017-05-09T17:50:55+5:302017-05-09T17:50:55+5:30
पॉम पॉम आणि टू टू हे लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशनच्या ट्रेण्डचं नाव आहे. सध्या ही फॅशन एकदम इन आहे.

पार्टीसाठी चिमुकल्यांची तयारी करता आहात का? मग त्यांना पॉम पॉम आणि टू टू घाला!
- मोहिनी घारपुरे - देशमुख
पॉम पॉम आणि टू टू.. आता यावरून तुम्हाला काय कळलं असेल? पॉम पॉम आणि टू टू हे लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशनच्या ट्रेण्डचं नाव आहे. सध्या ही फॅशन एकदम इन आहे. चिमुकल्या मंडळींसाठी बनविल्या जाणाऱ्या कपड्यांमधले हे दोन प्रकार आहेत.
पॉम पॉम आणि टू टू आपल्याकडे वापरले जाणारे गोंडे लावलेले कपडे म्हणजे पॉम पॉम. वेगवेगळ्या आकर्षक रंगाचे लोकरीचे गोंडे किंवा रंगीत कापडांचे बॉल्स लावलेले फ्रॉक, स्कर्ट म्हणजे पॉम पॉम. तर टू टू म्हणजे नेटच्या पारदर्शक कापडापासून बनवलेले कपडे.