गुवाहटीमध्ये ‘वार्षिक गे प्राईड वॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:55 IST2016-02-09T06:25:32+5:302016-02-09T11:55:32+5:30

सलग तिसºया वर्षी गुवाहटी शहरात ‘गे प्राईड वॉक’ मोठ्या उत्साहात पार पडली. आजूबाजूच्या भागातील आणि कोलकात्याहून एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांना यामध्ये सहभाग घेतला.

'Annual Gay Pride Walk' in Guwahati | गुवाहटीमध्ये ‘वार्षिक गे प्राईड वॉक’

गुवाहटीमध्ये ‘वार्षिक गे प्राईड वॉक’

ग तिसºया वर्षी गुवाहटी शहरात ‘गे प्राईड वॉक’ मोठ्या उत्साहात पार पडली. आजूबाजूच्या भागातील आणि कोलकात्याहून एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांना यामध्ये सहभाग घेतला. समलैंगी संबंध आणि लोकांविषयी समाजात असणाºया अनेक गैरसमजुतींबद्दल जनजागृती करण्याचे काम यावेळी करण्यात आले.

दोनशेपेक्षा जास्त गे, लेस्बियन, बायसेक्शुल आणि ट्रांस-जेंडर लोकांनी शहरातील दिगलीपुखुरी भागातून निघालेल्या पदयात्रेत सहभागी झाले होते. स्वत:ची स्वतंत्र ओळख, समाजाचा दबाव, लोकांच्या वाकड्या नजरा यांपासून विश्वास आणि आत्मसन्मान गमावलेल्या एलजीबीटी सुमदायातील लोकांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला दर वर्षी प्रतिसाद वाढत आहे.

यंदाच्या पदयात्रेतील चर्चेचा प्रमुख मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंधाना गुन्हा ठरविणाचा निर्णय कायम ठेवला होता आता त्याविषयी पाच न्यायाधिशांची एक समिती निर्णय घेणार आहे. त्यामुळे अनेक समलिंगी कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो की, कलम 377 कायमचा हद्दपार होऊन समलिंगी लोक आत्मसन्माने आणि कोणतीही भीती न बाळगता वावरतील. पाच न्यायाधीश समलिंगी लोकांचया अधिकारांच्या हिताचा विचार नक्कीच करणारतील असे त्यांना वाटते.

Web Title: 'Annual Gay Pride Walk' in Guwahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.