'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:53 IST2025-10-18T14:45:33+5:302025-10-18T14:53:31+5:30
'प्रेशियस, एव्हरी डे; जिथे तुम्ही स्वतःचा आनंद साजरा करता'

'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
भारतातील एक अग्रगण्य आणि ट्रेंड-सेटिंग फाइन ज्वेलरी ब्रँड, 'मिआ बाय तनिष्क'ने जेन झी स्टार अनीत पड्डा हिला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले आहे. अनीतचं धाडसी व्यक्तिमत्व, तिच्यातील ऊर्जा आणि आत्मविश्वास, आपण जसे आहोत तसं राहणं-वागणं-वावरणं ही गुणवैशिष्ट्यं प्रत्येक महिलेची मिळतीजुळती आहेत. 'मिआ'ने अनीतला ब्रँड ॲम्बेसेडर बनवणे हे आधुनिक, स्वतंत्र स्त्रीला सन्मानित करण्याच्या 'मिआ'च्या ब्रँड फिलॉसॉफीशी जुळणारे आहे. आधुनिक महिलांच्या आत्मविश्वासाची चमक स्पष्टपणे दिसून येते, त्या आपल्या अद्वितीय क्षमतेला चांगल्या प्रकारे जगासमोर आणतात. अनीतसोबत 'मिआ'ची 'प्रेशियस, एव्हरी डे' फेस्टिव्ह मोहीम अशा महिलांना सक्षम बनवण्याचा उत्सव आहे, ज्या स्वतःची वैयक्तिक प्रतिभा आणि आत्मविश्वास स्वीकारतात आणि तो सर्वांसमोर मांडतात.
ही कॅम्पेन फिल्म उत्सव किंवा सेलिब्रेशन संदर्भात आहे. 'फेमस इनोव्हेशन्स'ने त्याची संकल्पना केली आहे. यात अनीतने 'मिआ'च्या सर्वात नवीन कलेक्शन, 'मॅनिफेस्ट'मधील एक चोकर परिधान केला आहे. यात क्लासिक रूपांमध्ये आधुनिकता दर्शविली गेली आहे. त्यासाठी महलांच्या कमानी, पेस्ले आणि सोने, नैसर्गिक हिऱ्यांनी सजलेले कमळाचे फूल यांचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचबरोबर मोती, नैसर्गिक रंगीत सफायर आणि ॲव्हेंच्युरिन क्वार्ट्झ यांचाही या सजावटीत खूपच उत्कृष्ट पद्धतीने समावेश करण्यात आला आहे.
'मिआ'ची ही नवीन फेस्टिव्ह मोहीम फिल्म स्वतःवरील प्रेम आणि स्वतःच्या आवडीचा उत्सव आहे. जेव्हा या फिल्मची सुरुवात होते, तेव्हा आपण पाहतो की, अनीत तयार होत आहे, जणू काही एखाद्या खास संध्याकाळसाठी ती बाहेर जात आहे. खूप विचारपूर्वक ती 'मिआ'च्या 'मॅनिफेस्ट' कलेक्शनमधील डायमंड चोकर आणि इअररिंग्स निवडते. तिचे हावभाव हेच दाखवतात की, तिचे हे तयार होणे तिच्या स्वतःसाठी खूप महत्त्वाचे आहे. फिल्ममध्ये तिची लहान बहीण तिला विचारते की, ती कुठे जात आहे? तेव्हा अनीत आरशात पाहून, एका गोड हास्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणते की, ती स्वतःसोबत डेटवर जात आहे. याच क्षणी फिल्म 'स्वतःला ओळखणे, स्वीकारणे आणि स्वतःसह वेळ घालवणे हेच खरं सुख आहे' हा विचार अधोरेखित करते.
या मोहिमेत 'मिआ बाय तनिष्क'ने आजच्या पिढीच्या फेस्टिव्ह ज्वेलरीवर प्रकाश टाकला आहे. 'मिआ'ने या मोहिमेद्वारे महिलांना सांगितले की, त्यांनी स्वतःला दररोज 'प्रेशियस' बनवणारे खास क्षण सुवर्णमय बनवावे. ही फिल्म ब्रँडचे शानदार आणि अद्वितीय डिझाइन दाखवते. तसेच एक सांस्कृतिक बदल देखील दर्शवते. ज्यात आत्मविश्वास आणि स्वत: स्वतःच्या केलेल्या कौतुकावर भर दिला जातो. फिल्ममध्ये अनीत पड्डा खूपच सुंदर दिसत आहे. या मोहिमेत मिआने स्वतःवरील प्रेमाच्या प्रत्येक क्षणाचा सोबती म्हणून आपली ओळख दाखवली आहे. 'मिआ' ब्रँड साध्या क्षणांनाही उत्सवात बदलतो आणि महिलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर चमकण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यांना दररोज अनमोल बनण्यासाठी प्रोत्साहन देते - 'मिआ'चे 'प्रेशियस, एव्हरी डे'.
कॅम्पेनबद्दल मिआ बाय तनिष्कच्या बिझनेस हेड, श्रीमती श्यामला रमणन यांनी म्हटले की, "आजच्या महिलांना आत्मविश्वासाने स्वतःवर प्रेम करणे आणि त्याचा उत्सव साजरा करणे माहीत आहे. हे प्रेम केवळ कोणत्याही यशासाठी नाही, तर प्रत्येक दिवशीच असावे. हा एक सांस्कृतिक बदल आहे आणि 'मिआ'ने त्याला 'प्रेशियस, एव्हरी डे'मध्ये उत्कृष्टपणे दाखवले आहे. अनीत पड्डा तिच्या खऱ्या भावना आणि उत्साह, सहज कूल व्यक्तिमत्वाने या उत्सवाच्या नवीन आवाजाचे प्रतिनिधित्व करते, म्हणूनच ती 'मिआ'साठी परफेक्ट चेहरा आहे."
अनीत पड्डा म्हणाली, "'मिआ'चा फेस बनणे माझ्यासाठी खूपच गर्वाची गोष्ट आहे, कारण मिआ ब्रँड स्वतःला साजरं करायला शिकवतो आणि आपल्या अंतर्गत दिव्यतेला प्रत्येक दिवशी स्वीकारायला शिकवतो. 'मिआ' ब्रँड मला आवडतो कारण ते परिधान करण्यासाठी कोणत्याही माइलस्टोन किंवा खास दिवसाची आवश्यकता नाही. 'मिआ' म्हणजे आरशात पाहणे, आनंदी होणे आणि हे नेहमी लक्षात ठेवणे की, आपण प्रत्येक दिवशी 'प्रेशियस' आहोत."
फेमस इनोवेशन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मिथिला सराफ यांनी म्हटले की, "प्रेशियस, एव्हरी डे'मध्ये प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सत्य आहे, जी हे जाणते की तिचा प्रत्येक दिवस खास आहे आणि स्वतःला खूश ठेवण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. ज्यांना याचा विसर पडला आहे, त्यांना आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की, स्वतःवर अधिक प्रेम करा आणि स्वतःला अधिक चांगली वागणूक द्या. 'मिआ'ची ज्वेलरी आपल्याला आत्मविश्वासाची आणि स्वतःवर प्रेम करण्याची आठवण करून देते. ती खरेदी करण्यासाठी, परिधान करण्यासाठी आणि तिच्यासोबत आनंदी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही माईलस्टोन, खास प्रसंगाची किंवा बाह्य प्रेरणेची गरज नाही."
'मिआ बाय तनिष्क' बद्दल...
'तनिष्क' या प्रतिष्ठित दागिन्यांच्या ब्रँडची परंपरा आणि वारसा लाभलेला 'मिआ' हा आधुनिक, आत्मविश्वासपूर्ण आणि स्टायलिश दागिन्यांचा ब्रँड आहे. तरुण, उत्साही आणि स्टायलिश लोकांसाठी, 'मिआ' सोन्याचे आणि नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने अनोख्या, साध्या पण मोहक डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. 'मिआ'च्या या कलेक्शनमध्ये विविध प्रकारच्या डिझाईन्स आहेत, ज्या तुम्हाला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक प्रसंगासाठी सहजपणे स्टाईल करता येतील. 'मिआ'मध्ये १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्यात तयार केलेले, नैसर्गिक हिऱ्यांचे २५०० हून अधिक आकर्षक डिझाइन्स आहेत. दागिन्यांची किंमत केवळ ₹४,९९९* पासून सुरू होते आणि मेकिंग चार्जेस ९%* पासून सुरू होतात. 'मिआ' आपल्या प्रत्येक क्षणाला आणि प्रसंगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी खास डिझाइन्स तयार करते.
भारतभरातील ७५ शहरांमध्ये 'मिआ'चे २५० हून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स असून, हे दागिने निवडक तनिष्क स्टोअर्समध्ये देखील उपलब्ध आहेत. दुबईतील बुर्ज उमन सेंटर येथे उघडलेल्या त्यांच्या स्टोअरने 'मिआ'च्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात झाली आहे, यामध्ये सध्या यूएईचे तीन स्टोअर्स देखील आहेत.
'मिआ'च्या आकर्षक डिझाईन्स त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.miabytanishq.com/ वर तसेच इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म https://www.amazon.com/, https://www.tatacliq.com/, https://www.myntra.com/, आणि https://www.nykaafashion.com/ वर देखील उपलब्ध आहेत.