अँड्यू फिलंटॉफला धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 21:44 IST2016-03-29T04:42:47+5:302016-03-28T21:44:10+5:30
. संपूर्ण जग अमिताभ यांना ओळखत असताना अँड्यूला अमिताभ कोण हे ठाऊक नसणे,जरा अतीच झाले. पण अँड्यूला उत्तर तर द्यायलाच हवे...सर रवींद्र जडेजा याने अँड्यूला समर्पक उत्तर दिले.

अँड्यू फिलंटॉफला धोबीपछाड
टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या आॅस्ट्रेलिया वि. इंडिया सामन्यातील विराट कोहलीच्या खेळीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून सोडले. अमिताभ बच्चन हेही विराटच्या खेळीने चांगलेच प्रभावित झाले. म्हणूनच विराटला टोमणा मारणारा इंग्लडचा माजी क्रिकेटपटू अँड्यू फ्लिंटॉफला अमिताभ यांनी सडेतोड उत्तर दिले. इंग्लडचा युवा क्रिकेटपटू जो रूट हा विराटपेक्षाही महान खेळाडू असल्याचे संकेत देणारे टिष्ट्वट अँड्यू फ्लिंटॉफने भारत-आॅस्ट्रेलिया सामन्यानंतर केले. कोहली असाच खेळला तर एकदिवस नक्की जो रूट याची बरोबरी करेल, असे टिष्ट्वट त्याने केले. अमिताभ यांना विराट व जो रूटची तुलना अजिबात रूचली नाही. मग काय, त्यांनी अँड्यू फ्लिंटॉफ याला चांगलाच चिमटा काढणारा रिप्लाय दिला. ‘कोण रूट, रूटला मुळापासून उखडून देऊ’ असे अमिताभ म्हणाले. साहजिकच अमिताभ यांचे हे टिष्ट्वट अँड्यू याला चांगलेच झोंबले. त्यामुळेच ‘सॉरी हू इज धीस’ असे रिटिष्ट्वट अँड्यूने केले. संपूर्ण जग अमिताभ यांना ओळखत असताना अँड्यूला अमिताभ कोण हे ठाऊक नसणे,जरा अतीच झाले. पण अँड्यूला उत्तर तर द्यायलाच हवे...सर रवींद्र जडेजा याने अँड्यूला समर्पक उत्तर दिले. त्याने टिष्ट्वट केले, रिश्ते में तो वो तुम्हारे बाप लगते है, नाम है शहेनशां...व्वा, मान गये, जडेजा, इसको बोलते है जवाब...
@flintoff11@imVkohli@root66@englandcricket Root who ? जड़ से उखाड़ देंगे Root ko ..!!!
andrew flintoff
Amitabh Bachchan
Sir Ravindra Jadeja