थोडक्यात वाचला एमीचा पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:47 IST2016-04-28T15:17:01+5:302016-04-28T20:47:01+5:30
‘ट्रेनरॅक’ची स्टार अभिनेत्री शूमर एमीचा सर्फिग दरम्यान झालेल्या अपघातात थोडक्यात पाय वाचला आहे. या भयावह अनुभवाची आठवण सांगताना ती म्हणाली की, सर्फिंगच्या बोर्डाचा टोकदार हिस्सा माझ्या उजव्या पायात घुसला होता.

थोडक्यात वाचला एमीचा पाय
‘ ्रेनरॅक’ची स्टार अभिनेत्री शूमर एमीचा सर्फिग दरम्यान झालेल्या अपघातात थोडक्यात पाय वाचला आहे. या भयावह अनुभवाची आठवण सांगताना ती म्हणाली की, सर्फिंगच्या बोर्डाचा टोकदार हिस्सा माझ्या उजव्या पायात घुसला होता. त्यामुळे पायाला खोलवर जखम झाली होती. प्रचंड रक्तस्त्राव होत होता. मला पायला झटका मारून सर्फिंग बोर्ड बाजुला सारावा लागला. प्रचंड वेदना होत असताना मी किनाºयापर्यंत पोहचली. लगेचच एक सुंदर तरुण माझ्याकडे धावत आला. त्याने रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. १५ मिनिटानंतर पायावर उपचार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत माझा पाय वाचला. मात्र दु:ख याचे वाटते की, ज्या तरुणाने माझी मदत केली त्याचे मला अजुनही आभार मानता आले नाहीत. मात्र एक गोष्ट नक्की होती की, तो तरुण खुप सुंदर होता, असेही एमीने सांगितले.