अमेरिकेत वाढतेय आईवडिलांसोबत राहण्याचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 20:53 IST2016-05-29T15:23:49+5:302016-05-29T20:53:49+5:30

18 ते 34 वयोगटातील लोक आपल्या आईवडिलांच्या घरात राहण्याची शक्यता वाढली आहे.

Amount of living with growing parents in the United States | अमेरिकेत वाढतेय आईवडिलांसोबत राहण्याचे प्रमाण

अमेरिकेत वाढतेय आईवडिलांसोबत राहण्याचे प्रमाण

ेरिकेत मुलं कॉलेज जाण्याच्या वयाची झाली की, आईवडिलांपासून वेगळा राहू लागतात. स्वतंत्र राहण्याचा त्याचा कल असतो. मात्र आता हा कल हळूहळू कमी होताना दिसतोय.

प्यू रिसर्च सेंटरतर्फे करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात असे दिसून आले की, 18 ते 34 वयोगटातील लोक आपल्या आईवडिलांच्या घरात राहण्याची शक्यता वाढली आहे.

असे होण्याचे प्रमाण जरी सध्या कमी असले तरी गेल्या 130 वर्षात प्रथमच असा ट्रेंड दिसून येत आहे. या मागचे कारण म्हणजे सामाजिक रचना. आजच्या पीढीतील तरुण लग्न करून स्वतंत्र कुटुंब स्थापन करण्याच्या मनस्थितीत नाही. लग्न तुटण्याचे प्रमाण याचेच लक्षण आहे.

सन 1880 पासून ते आजतयागत अमेरिकेच्या सामाजिक संरचनेच्या आधारावर हे संशोधन करण्यात आले आहे. पूर्वी लोक जोडीदारासोबत घरातून पळून जाऊन स्वत:चे कुटुंब निर्माण करण्यावर भर द्यायचे आणि जे लोक ठराविक वयानंतर आईवडिलांसोबत राहायचे त्यांना तुच्छतेने पाहिले जात असे.

परंतु आजकाल समाज आणि समज दोन्ही बदललेले आहेत. आईवडिलांसोबत त्यांच्याच घरात राहण्याचे कारण सांगताना युवकांनी सांगितले की, यामुळे करिअरबद्दल विचार करण्यास वेळ मिळतो तसेच स्वत:चे घर घेण्यासाठी बचतही होते.

Web Title: Amount of living with growing parents in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.