ट्विटरवर अमिताभ बच्चन ‘सैराट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 19:47 IST2016-05-22T14:14:42+5:302016-05-22T19:47:17+5:30
अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे.
.jpg)
ट्विटरवर अमिताभ बच्चन ‘सैराट’
73 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांच्यापुढे बॉलीवूडचे बाकीचे सगळेच कलाकार खूप मागे आहेत. शाहरुख खानचे ट्विटरवर 1.96 कोटी फॉलोअर्स आहेत, तर सलमान खानचे 1.78 कोटी फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्राला 1.4कोटी जण फॉलो करतात.
अमिताभ बच्चन यांनी मे 2010 मध्ये ट्विटरवर अकाऊंट उघडलं होतं. 2.1 कोटी फॉलोअर्स झाल्याचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. आत्तापर्यंत अमिताभ यांनी 49 हजारांपेक्षा जास्त ट्विट्स केले आहेत.