​अमेरिकेची अण्वस्त्र सेना अजुनही वापरते फ्लॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 14:05 IST2016-05-26T08:35:07+5:302016-05-26T14:05:07+5:30

जगातील सर्वात मोठ्या संरक्षण सेनेच्या अण्वस्त्र विभागाचे काम अजूनही सत्तच्या दशकातील संगणकप्रणाली आणि फ्लॉपीवर केला जातो.

America's nuclear force still uses floppy | ​अमेरिकेची अण्वस्त्र सेना अजुनही वापरते फ्लॉपी

​अमेरिकेची अण्वस्त्र सेना अजुनही वापरते फ्लॉपी

च्या पीढीला चाळीस वर्षांपूर्वी कॉम्प्युटर प्रणाली कशी असेल याची कल्पना घ्यायची असेल तर अमेरिकेच्या अण्वस्त्र सेनेचे कामकाज पाहून ती निश्चितच येईल.

कारण जगातील सर्वात मोठ्या संरक्षण सेनेच्या अण्वस्त्र विभागाचे काम अजूनही सत्तच्या दशकातील संगणकप्रणाली आणि फ्लॉपीवर केले जाते.

गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी आॅफिसने दिलेल्या रिपोर्टनुसार पेंटागॉनमधील अनेक विभाग असे आहेत जिथे त्वरित आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची नितांत गरज आहे.

जुने तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री मेन्टेन करण्यासाठी करनिधीतून सुमारे 61 बिलियन डॉलर्स (सुमारे चार लाख कोटी) एवढा प्रचंड खर्च होतो, जो की नवीन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याच्या खर्चाच्या तिपटीपेक्षा जास्त आहे.

संरक्षण विभाग को-आॅर्डिनेट करत असलेल्या क्षेपणास्त्रे, न्युक्लियर  बॉम्बर्स आणि टँकर सपोर्ट करणाºया विमानांची प्रणाली आयबीएम सिरिज-1 कॉम्प्युटर आणि आठ इंचाच्या फ्लॉपीडिस्कवर काम करते. याबाबत बोलताना पेंटागॉनच्या प्रवक्त्या लेफ्ट. कर्नल वॅलेरी हेंडरसन म्हणाल्या की, हे तंत्रज्ञान कालबाधित जरी असले तरी अजुनही काम करते म्हणून याचा वापर केला जातो.

पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत फ्लॉपीडिस्कचा वापर संपूर्णपणे बंद करून त्याऐवजी डिजिटल डिव्हाईसेसचा वापर सुरू करण्यात आहे. तसेच लवकरात लवकर न्युक्लियर कमांड, कंट्रोल अँड कॉम्युनिकेशन विभागाचे आधुनिकिकरण केले जाणार असल्याचे त्यांनी माहिती दिली. 2020 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. 

Web Title: America's nuclear force still uses floppy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.