अ‍ॅमेझॉनची नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 07:56 IST2016-02-26T14:56:10+5:302016-02-26T07:56:10+5:30

अ‍ॅमेझॉनने आता चित्रपट वितरणात उडी घेतली आहे. 

Amazon's new innings | अ‍ॅमेझॉनची नवी इनिंग

अ‍ॅमेझॉनची नवी इनिंग

नलाईन शॉपिंगच्या क्षेत्रातील दादा कंपनी अ‍ॅमेझॉनने आता विविध क्षेत्रात आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. कंपनीने आता चित्रपट वितरणात उडी घेतली आहे. 

लेजेंडरी फिल्ममेकर वुडी अ‍ॅलन यांच्या आगामी चित्रपटाचे उत्तर अमेरिकेतील वितरण हक्क कंपनीने विकत घेतल आहेत. अद्याप चित्रपटाचे नाव ठरलेले नसून 1930च्या काळात घडणाºया या रोमँटिक कॉमेडीमध्ये स्टीव्ह कॅरल, ब्लेक लाईव्हली आणि क्रिस्टेन स्ट्युअर्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अ‍ॅमेझॉन पारंपरिक पद्धतीने हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलिज करणार आणि त्यानंतर प्राईम सर्व्हिस मेंबर्ससाठी आॅनलाईन स्ट्रिमिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबद्दल बोलताना इव्हरग्रीन वुडी विनोदाने म्हणाला की, ‘प्रत्येक नवीन नात्याच्या सुरुवातीला असणाºया साºया अपेक्षा, इच्छा आणि कायद्याशीर भांडणे या कराराच्या बाबतीतही होतील.’

amazon

अ‍ॅमेझॉनशी मिळून वुडी एक टीव्ही शोसुद्धा बनवत आहे. वर्षाच्या शेवटी ती आॅनलाईन उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. स्वत: वुडी, एलेन मे आणि माईली सायरस यामध्ये काम करत आहेत.

Web Title: Amazon's new innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.