अॅमेझॉन कर्मचारी करणार आठवड्याला केवळ ३० तास काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 20:28 IST2016-09-01T14:58:07+5:302016-09-01T20:28:07+5:30
कंपनीत काम करणाऱ्या तांत्रिक विभागातील विशिष्ट कर्मचारी गटातील सदस्यांना आठवड्यातून केवळ तीस तास काम कराण्यची मुभा देण्यात आली आहे.

अॅमेझॉन कर्मचारी करणार आठवड्याला केवळ ३० तास काम
ई- कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने आपली ‘प्रतिमा’ सुधारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. कंपनी व्यवस्थपनाने प्रयोगिक तत्त्वावर ‘आठवड्याला तीस तास काम’ हे नवे धोरण सुरू केले. कंपनीत काम करणाऱ्या तांत्रिक विभागातील विशिष्ट कर्मचारी गटातील सदस्यांना आठवड्यातून केवळ तीस तास काम कराण्यची मुभा देण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या एकंदर कल्याणाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. कामाचा व्याप आणि ताण कमी करून त्यांच्या कार्यक्षमतेची वृद्धी करण्यात येणार आहे. कामाचे तास कमी केले तरी कर्मचाऱ्यांची करिअर वाढ थांबणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
कर्मचाºयांसाठी आदर्श वातावरण निर्माण करण्याची गरज कंपनीला का भासली असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील एका प्रमुख वर्तमानपत्राने तेथे काम करणाऱ्या व काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन कंपनी व्यवस्थापनाचा मनमानी कारभार आणि असंवेदनशीलतेचा चेहरा समोर आणला होता.
cnxoldfiles/span> वैविध्यपूर्ण कर्मचाºयांना कामाच्या बाबतीत एकच नियम नाही लावला जाऊ शकत. त्याला पर्याय म्हणून आम्ही वेगळे मॉडेल शोधत आहोत.