​रेकॉर्डसाठी त्याने काढले सर्व दात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 22:10 IST2016-05-27T16:40:53+5:302016-05-27T22:10:53+5:30

तोंडात सर्वात जास्त स्ट्रॉ ठेवण्याचा जागतिक विश्वविक्रम अर्थातच गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी त्याने आपल्या मुखातील शाबूत दात काढले.

All the teeth removed for the record | ​रेकॉर्डसाठी त्याने काढले सर्व दात

​रेकॉर्डसाठी त्याने काढले सर्व दात

श्वविक्रम रचण्याचे असे काही वेड त्याच्यावर आरुढ झाले की, त्याने सर्वच्या सर्व दात काढून टाकले. ही कहाणी आहे आपल्याच देशातील एका अवलियाची. हर प्रकाश ऋषी असे त्याचे नाव.

तोंडात सर्वात जास्त स्ट्रॉ ठेवण्याचा जागतिक विश्वविक्रम अर्थातच गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी त्याने आपल्या मुखातील शाबूत दात काढले.

स्वत:ला ‘गिनिज ऋषी’ म्हणणाऱ्या या अवलियाने 20 जागतिक विश्वविक्रम रचल्याचा दावा केला आहे. 74 वर्षीय ऋषीने 1990 साली दोन मित्रांसह त्याने 1001 तास स्कुटर चालवून पहिला विक्रम केला होता.

तेव्हापासून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदविण्याची अशी काय त्याला ओढ लागली त्याकरिता त्याने अनेक विचित्र आणि विलिक्षण गोष्टी के ल्या आहेत.

एकदा तर त्याने दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात पिझ्झा डिलिव्हर केला होता. चार मिनिटांच्या आत टोमॅटो केचअपची संपूर्ण बॉटल पिण्याची कमाला त्याने केलेली आहे. त्याच्या या कामात कुटुंबियदेखील साथ देतात. त्याची पत्नी बिमलाने 1991 साली जगातील सर्वात लहान मृत्यपत्र (सर्व मुलासाठी) लिहिण्याचा विक्रम केला होता. 

Rishi

तो सांगतो, दात काढल्यामुळे मी तोंडात 496 स्ट्रॉ ठेवण्याचा विक्रम करू शकलो. तसेच 50 जळत्या मेणबत्त्या तोंडात धरण्याचाही विक्रमही त्याने केला आहे. व्यावसायाने आॅटो पार्ट उत्पादक असलेल्या ऋषीच्या अंगावर 500 पेक्षा जास्त टॅटू असून त्यामध्ये 366 विविध प्रकारचे झेंडे आहेत. नरेंद्र मोदी, बराक ओबाम, महात्मा गांधी आणि राणी एलिझाबेथ यांच्या टॅटूचादेखील सामावेश आहे.

Rishi

Web Title: All the teeth removed for the record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.