‘अलिबाबा’ मालकाने विकत घेतले ऐतिहासिक ‘विनयार्ड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:44 IST2016-06-11T10:14:54+5:302016-06-11T15:44:54+5:30
जॅक मा यांनी नुकतेच फ्र ान्समधील दोन ऐतिहासिक द्राक्षमळे (विनयार्ड) विकत घेतले आहेत.

‘अलिबाबा’ मालकाने विकत घेतले ऐतिहासिक ‘विनयार्ड’
च नचे अब्जाधीश आणि ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा यांनी नुकतेच फ्रान्समधील दोन ऐतिहासिक द्राक्षमळे (विनयार्ड) विकत घेतले आहेत.
प्रसिद्ध बोर्डाेव भागातील शॅट्योव् गेरी’ आणि ‘शॅट्योव् पेरेन्ने’ ही अठराव्या शतकातील दोन द्राक्षमळे मा यांनी सुमारे 13.56 मिलियन डॉलर्समध्ये (सुमारे 90 कोटी रु.) खेदी केले आहेत.
पूर्व मालक बर्नार्ड मॅग्रेज याविषयी अधिकृत घोषणा करून दुजोरा दिला आहे. 158 एकरवर पसरलेल्या ‘शॅट्योव पेरेन्ने’मधून रेड आणि व्हाईट वाईनचे दरवर्षी 5 लाख बॉटल्स तर ‘शॅट्योव गेरी’च्या 50 एकरवर 84 हजार बॉटल्स एवढे उत्पादन होते.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच मा यांनी ‘शॅट्योव् डी सौर्स’ द्राक्षमळादेखील खरेदी केला होता. सध्या फ्रान्समधील सुमारे शंभरपेक्षा जास्त विनयार्डस् चीनच्या व्यावसायिकांच्या मालकीचे असून एक उत्तम गुंतवणूक म्हणून चीन व्यावसायिक द्राक्षमळे विकत घेताना दिसत आहेत.
यामागखे कारण की, चीनमध्ये ऐतिहासिक फ्रेंच विनयार्डचे मालक असणे एक उच्चभ्रूपणाचे प्रतीक आहे. तसेच बोर्डाेव भागातील रेड वाईनच्या निर्यातीमध्ये चीन सर्वात मोठी बाजार पेठ आहे.
![Jack Ma]()