ALERT : काहीच दिवस शिल्लक : आपल्या बॅँक अकाउंटशी आधार लिंकिंग करा, अन्यथा होईल ब्लॉक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 17:49 IST2017-04-20T12:03:57+5:302017-04-20T17:49:31+5:30

जर आपण आपला आधार नंबर बॅँकेशी लिंकिंग केला नसेल तर हा महिना संपण्याअगोदर हे काम करा. नाहीतर तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकते.

ALERT: Some days left: linking to your bank account, otherwise the block will be! | ALERT : काहीच दिवस शिल्लक : आपल्या बॅँक अकाउंटशी आधार लिंकिंग करा, अन्यथा होईल ब्लॉक !

ALERT : काहीच दिवस शिल्लक : आपल्या बॅँक अकाउंटशी आधार लिंकिंग करा, अन्यथा होईल ब्लॉक !

ong>-Ravindra More
जर आपण आपला आधार नंबर बॅँकेशी लिंकिंग केला नसेल तर हा महिना संपण्याअगोदर हे काम करा. नाहीतर तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकते. शिवाय आपले काही कागदपत्रेदेखील वेरिफाय करावेत. आयकर विभागाने सांगितले आहे की, १ जुलै २०१४ पासून ३१ आॅगस्ट २०१५ दरम्यान ज्यांचे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत, त्यांचे कागदपत्रे अपूर्ण असल्यास ते अकाउंट ब्लॉक करण्यात येतील. 

सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेसने एक स्टेटमेंट जाहिर केले आहे की, ज्यांचे ‘केवायसी’ कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांना सुचित करण्यात आले आहे की, ३० एप्रिल २०१७ च्या अगोदर त्यांच्या सेल्फ सर्टिफाइड प्रति बॅँकेत जमा करावेत. असे केले नाही त्यांचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. याचा अर्थ असा की, त्यांच्या अकाउंटमधून ते कोणताच व्यवहार करु शकणार नाहीत. हा निर्णय ‘फॉरेन अकाउंट टॅक्स कंप्लिएन्स अ‍ॅक्ट’ नुसार घेण्यात येणार आहे. 
हे फक्त बॅँक अकाउंटसोबतच नव्हे तर म्यूच्यूूअल फंड्स, इंशोरन्स सारख्या सेवांवरदेखील याचा परिणाम होईल. एकदा डिटेल्स अपडेट के ल्यानंतर अक ाउंट होल्डर पुन्हा आपले खाते आॅपरेट करु शकतो. 

जुलै २०१५ मध्ये भारत आणि अमेरिकाने यूएसच्या कायद्यानुसार टॅक्स इन्फॉरर्मेशन शेयरिंग एग्रीमेंट साइन केला होता. हा करार काळापैशावर निर्बंध आणण्यासाठी करण्यात आला होता. याशिवाय भारत आणि अमेरिका वित्तीय संस्थांशी संलग्नित राहून टॅक्स चोरांवर नजर ठेऊ  शकतात.  
जर काही कारणास्तव अंतिम तारखेदरम्यान केवायसी देऊ शकले नाही आणि आपले अकाउंट ब्लॉक झाले तर घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण नंतर कधीही जमा करुन अकाउंट अनब्लॉक करु शकता. मात्र त्रासापासून वाचण्यासाठी वेळेतच कागदपत्रांची पूर्तता करावी.  

Also Read : ​Good News : आधार कार्डमध्ये चुक किंवा अपूर्ण माहिती असेल तर असे करा घरीच अपडेट !

 

Web Title: ALERT: Some days left: linking to your bank account, otherwise the block will be!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.