Alert : असे केले नाही तर १ जुलै नंतर तुमचे पॅनकार्ड होऊ शकते रद्द !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 17:37 IST2017-04-28T12:07:27+5:302017-04-28T17:37:27+5:30

दोन्ही कार्ड एकमेकांशी जोडल्यानंतर माहितीत फरक आढळल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते, म्हणजे तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते.

Alert: If this is not done then your PAN card can be canceled after 1 July! | Alert : असे केले नाही तर १ जुलै नंतर तुमचे पॅनकार्ड होऊ शकते रद्द !

Alert : असे केले नाही तर १ जुलै नंतर तुमचे पॅनकार्ड होऊ शकते रद्द !

सनाच्या नियमानुसार सर्वच भारतीयांना १ जुलैच्या आत पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना लिंक करायचे आहेत, मात्र तत्पुर्वी पॅनकार्ड आणि आधारकार्ड वरील आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये आहे का? याची खात्री करुन घ्या, जर नावात साम्यता नसेल तर त्यात आताच बदल क रावा. दोन्ही कार्ड एकमेकांशी जोडल्यानंतर माहितीत फरक आढळल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते, म्हणजे तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. 
पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडल्यानंतर अधिकाऱ्याकडून होणार असलेल्या तपासणीत पॅनकार्डवरील तुमच्या नावाचे स्पेलिंग आणि आधारवरील स्पेलिंग यामध्ये एका अक्षराचाही फरक आला तर पॅनकार्ड सरळ रद्द केले जाणार आहे.
सध्या संपूर्ण देशभरात पॅनकार्ड आणि आधारकार्डची तपासणी चालू आहे. अनेकजणांच्या पॅनकार्डवर त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये आणि आधारकार्डवर देण्यात आलेल्या स्पेलिंगमध्ये फरक असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पॅनकार्ड व आधारकार्डमध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी लाखो नागरिकांनी अर्ज केले आहेत.
आयकर विभागाच्या संकेतस्थळावरही पॅनकार्ड आणि आधार कार्ड मध्ये द्यावयाची माहिती अपडेट करता येणार आहे. एवढेच नाही तर नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेली चुकही आॅनलाईल दुरुस्त करता येणार आहे. पण हे सगळे १ जुलैच्या आत करावयाचे आहे. कारण त्यानंतर दोन्ही कार्डातील माहितीमध्ये साम्य आढळले नाही तर तुनचे पॅनकार्ड रद्द होण्याचा धोका आहे. 

Also Read : ​ALERT : काहीच दिवस शिल्लक : आपल्या बॅँक अकाउंटशी आधार लिंकिंग करा, अन्यथा होईल ब्लॉक !

Web Title: Alert: If this is not done then your PAN card can be canceled after 1 July!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.